---Advertisement---

अवघ्या 23व्या वर्षी बोहल्यावर चढला आफ्रिकन गोलंदाज, भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच थाटला संसार; पाहा Photos

On: मंगळवार, डिसेंबर 5, 2023 1:04 PM
Gerald-Coetzee
---Advertisement---

Gerald Coetzee’s Marriage: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 10 डिसेंबरपासून 3 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेपूर्वीच क्रिकेटविश्वातून आनंदाची बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिका संघाचा युवा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएट्जी लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

गेराल्ड कोएट्जीचे लग्न
खरं तर, दक्षिण आफ्रिका संघाचा 23 वर्षीय वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएट्जी (Gerald Coetzee) याचे लग्न मागील महिन्यातच झाले होते. त्याने 29 नोव्हेंबर, 2023 रोजी हॅना कोएट्जी (Hannah Coetzee) हिच्यासोबत संसार थाटला. मात्र, दोघांच्या लग्नाचे फोटो आता व्हायरल होत आहेत.

या फोटोवर चाहते अभिनंदनचा वर्षाव करत आहेत. एकाने कमेंट करत लिहिले की, “अभिनंदन कोएट्जी.” दुसऱ्या एकाने कमेंट केली की, “कोएट्जी काय गोलंदाज आहे.” यावेळी एका युजरने कमेंटमध्ये सीएसकेचाही समावेश केला. त्याने लिहिले की, “कोएट्जी सीएसकेमध्ये जाण्यासाठीचे बटन.”

गेराल्ड कोएट्जी याने नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेत धमाल प्रदर्शन केले होते. कोएट्जीने फक्त 8 सामने खेळताना 19.80च्या सरासरीने 20 विकेट्स घेतल्या होत्या. तो विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी होता. अशात आता आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेच्या लिलावात त्याचे नशीब चमकू शकते.

कोएट्जीची विश्वचषकातील कामगिरी पाहून त्याच्यावर आयपीएल 2024 लिलावात चांगली बोली लागू शकते. आयपीएल 2024साठी त्याने आपली बेस प्राईज 2 कोटी रुपये ठेवली आहे. अशात हे पाहणे रंजक ठरेल की, त्याच्यावर संघ केवढी बोली लावतात आणि त्याला कोणता संघ आपल्या ताफ्यात घेण्यात यशस्वी होतो.

कोएट्जीची कारकीर्द
कोएट्जी दक्षिण आफ्रिकेकडून तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळतो. त्याने 2023मध्येच आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 2 कसोटी, 14 वनडे आणि 3 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 9 विकेट्स, वनडेत 31 विकेट्स आणि टी20त 3 विकेट्स घेतल्या आहेत. (south africas fast Bowler gerald coetzee married before ind vs sa three format series read more)

हेही वाचा-
धक्कादायक! व्यक्तीला कपड्यांमुळे मिळाली नाही विराटच्या रेस्टॉरंटमध्ये एन्ट्री, व्हिडिओ काढत सांगितलं गाऱ्हाणं
ही तेंडुलकरची महानता! अफगाणी ओपनरविषयी जडेजाने सांगितला किस्सा; म्हणाला, ‘मी त्याला सचिनचे पुस्तक वाचताना…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---