---Advertisement---

काय सांगता! एकाच सामन्यात ९ फलंदाज झाले शून्यावर बाद…

On: रविवार, डिसेंबर 8, 2019 7:31 PM
---Advertisement---

कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात एका संघाचे 10 फलंदाज एकही धाव करू शकले नाहीत हे आश्चर्य वाटेल. परंतु, शनिवारी हे घडले आहे. शनिवारी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचा प्लेऑफचा सामना मालदीव महिला संघ विरुद्ध नेपाळ महिला संघात पार पडला.

या सामन्यात मालदीवच्या महिला संघाचे 9 फलंदाज एकही धाव न करता शून्य धावेवर बाद होऊन पव्हेलियनमध्ये परतले. तर एक फलंदाज शून्य धावेवर नाबाद राहिली.

मालदीवकडून केवळ सलामीला फलंदाजी केलेल्या ऐमा एैशतने केवळ 1 धाव केली. तर उर्वरित 7 धावा अतिरिक्त मिळाल्या.  त्यामुळे मालदीवचा संघ 11.3 षटकांत नेपाळविरुद्ध 8 धावांवर सर्वबाद झाला.

या सामन्यात नेपाळकडून खेळताना अंजली चंदने (Anjali Chand) 2 फलंदाजांना त्रिफळाचीत केले. तसेच स्वत: च्याच चेंडूवर 1 झेल घेतला आणि एका फलंदाजाला पायचीत करत 1 विकेट घेतली. असे मिळून तिने 4 षटकांत केवळ 1 धाव देऊन 4 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे तिने यातील 3 षटके निर्धाव टाकली.

खास गोष्ट म्हणजे अंजलीच्या कारकीर्दीतील हा दुसरा टी20 आंतरराष्ट्रीय सामना होता. आता तिच्या नावावर केवळ 2 सामन्यांत 10 विकेट्सची नोंद झाली आहे. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे अंजलीने यासाठी केवळ 1 धाव दिली आहे.

यापूर्वी, 24 वर्षीय अंजलीने सोमवारी(2 डिसेंबर) याच स्पर्धेत मालदीव विरुद्धच एकही धाव न देता 6 विकेट्स घेण्याचा इतिहास रचला होता. त्यामुळे ती आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये(पुरुष आणि महिला मिळून) सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन (the best bowling figures) करणारी क्रिकेटपटू ठरली होती.

शनिवारी झालेल्या सामन्यात मालदीवने दिलेले 9 धावांचे आव्हान नेपाळच्या महिला संघाने केवळ 7 चेंडूंमध्ये पूर्ण केले. नेपाळकडून सलामीला फलंदाजी करताना काजल श्रेष्ठने नाबाद 2 आणि रोमा थापाने नाबाद 5 धावा केल्या. तसेच त्यांना 2 धावा अतिरिक्त मिळाल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---