पुणे, ७ डिसेंबर २०२३: भारतीय सेना दलाच्या ५३ व्या विजय दिनाच्या निमित्ताने दक्षिण विभागाच्या मुख्यालयाने आयोजित केलेल्या सदर्न स्टार विजय रन 2023 ही स्पर्धा शनिवार, १६ डिसेंबर २०२३ रोजी ऐतिहासिक पुणे रेस कोर्स येथे पार पडणार आहे. ‘रन फॉर सोल्जर्स, रन विथ सोल्जर्स’ ही या स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना असून १९७१ च्या युद्धात देशासाठी बलिदान देणाऱ्या शुर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना मेजर जनरल योगेश चौधरी, व्हीएसएम मेजर जनरल अॅडमिनिस्ट्रेशन आणि ब्रिगेडियर ए के कुट्टी, ब्रिग अ ॅडम यांनी सांगितले की, १९७१ मधील युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आणि सैनिक यांच्या संयुक्त उपक्रमासाठी आम्ही सर्व नागरिकांना आमंत्रित करीत आहोत. तसेच, १९७१च्या विजयाच्या ५३व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने देशभक्ती आणि शौर्याची भावना रुजवण्याकरिता निवडक धावपटू ५३ तासांच्या दौडीत भाग घेणार आहेत. हा उपक्रम म्हणजे केवळ सैनिकांबरोबर सहभागी होण्याची सर्वसाधारन मिळणारी सुवर्णसंधी नसून लक्षरी जीवन शैलीचा परिचय करून घेण्याची ही संधी ठरणार आहे.
पुण्यातील विजय रन या दौडीला सेना दलाच्या दक्षिण विभागाचे कमांडर लेफ्टनंट जनरल एके सिंग (एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम) यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. अशाच प्रकारे १० राज्यांमधील मुंबई, चेन्नई, हैद्राबाद, जोतपुर अशा एकूण १९ शहरांमध्ये त्याच दिवशी एकाच वेळी अशा विजय रनचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाच्या सर्व स्तरांमधून सुमारे ५००००धावपटू सहभागी होतील. यातील महत्वपूर्ण सदर्न स्टार विजय रन दौडीत पुण्यातील ऐतिहासिक १९० वर्षे जुन्या पुणे रेस कोर्स वर होणारी विजय रन प्रतिष्ठेची ठरेल. निसर्ग सुंदर अशा डर्बी रेसच्या मार्गावर धावण्याचा आनंद धावपटूंना घेता येणार आहे.
शर्यतीसाठी नोंद करणाऱ्या प्रत्येक धावपटू ला ड्राय फिट रन टी शर्ट, फिनिशर बॅज, पौष्टिक अल्पोपहार, हायड्रेशन पॅक आणि वैद्यकीय साहाय्य मिळणार आहे. याप्रसंगी सेना दलाच्या पाईप बँडचे वादन, सैनिकांनी सादर केलेला गटका, एरोबिक्स शो, सेना दलाच्या हेलीकॅप्टर कवायती जाझ बँडसह डीजे म्युझिक असे विविध कार्यक्रमही होणार आहेत.
विजय रन मधील विविध गटांमध्ये ५३ तासांचा अल्ट्रा रन, व्यावसायिक धावपटूंसाठी वैयक्तिक व रिले शर्यती, पुरूष व महिला धावपटूंसाठी खुल्या गटात १२.५ किलोमीटर अंतराची शर्यत, ज्येष्ठ पुरूष व महिला सैनिकांसाठी खास शर्यत आणि विद्यार्थ्यांसह सर्व पुरूष व महिलासाठी ५ किलोमीटरचा खुला गट या विभागांचा समावेश आहे.
सर्व गटातील विजेत्यांसाठी एकूण ५लाख रुपयांची रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत. यातील ५३ तासांच्या अल्ट्रा रनसाठी नावनोंदणीची अंतिम तारीख १३ डिसेंबर २०२३ असून १२.५ किलोमीटर, ६ किमी आणि ५ किमी साठी १४ डिसेंबर २०२३ पर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. सर्व गटसाठी नावनोंदणी www.runbuddies.club या संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
मुकेश कुमार लग्नानंतर दुसऱ्या इनिंगसाठी पूर्णपणे तयार, मजेशीर व्हिडिओ झाला व्हायरल
नोव्हेंबरच्या आयसीसी प्लेअर ऑफ द मंथसाठी हे तीन दावेदार, भारतीय चाहत्यांमध्ये जळफळाट