---Advertisement---

एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद: पीवायसी 1, पीवायसी 2 संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

On: रविवार, मे 1, 2022 11:24 AM
Jayant-Kadhe-and-Radhika-Kanitkar-of-PYC-1
---Advertisement---

पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या वतीने एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत राउंड रॉबिन फेरीत पीवायसी 1, पीवायसी 2 या संघांनी अनुक्रमे महाराष्ट्र मंडळ व एमडब्लूटीए 1 संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत इलाईट डिव्हिजन गटात ऋतू कुलकर्णी, डॉ.अभय जमेनीस, जयंत कढे, राधिका कानिटकर, अभिषेक ताम्हाणे, केतन धुमाळ, केदार शहा, अनुप मिंडा यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी 1 संघाने महाराष्ट्र मंडळ संघाचा 24-04 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.

दुसऱ्या सामन्यात पीवायसी 2 संघाने एमडब्लूटीए 1 संघाचा 24-05 असा पराभव केला. विजयी संघाकडून हिमांशू गोसावी, प्रशांत गोसावी, सुंदर अय्यर, योगेश पंतसचिव, रोहित शिंदे, नरहर गर्गे, अमित लाटे, रोहन दळवी यांनी सुरेख कामगिरी बजावली.

निकाल: राउंड रॉबिन: इलाईट डिव्हिजन:
पीवायसी 1 वि.वि.महाराष्ट्र मंडळ 24-04(100अधिक गट: ऋतू कुलकर्णी/डॉ.अभय जमेनीस वि.वि.सुनील झाल्टे/संजय सेठी 6-3; 90अधिक गट: जयंत कढे/राधिका कानिटकर वि.वि.विक्रम श्रीश्रीमळ/विकास बचलू 6-1; खुला गट: अभिषेक ताम्हाणे/केतन धुमाळ वि.वि.राजेंद्र देशमुख/अभिषेक चव्हाण 6-0; खुला गट: केदार शहा/अनुप मिंडा वि.वि.कमलेश शहा/संजय सेठी 6-0);

पीवायसी 2 वि.वि.एमडब्लूटीए 1 24-05(100अधिक गट: हिमांशू गोसावी/प्रशांत गोसावी वि.वि.गजानन कुलकर्णी/आशिष डिके 6-2; 90 अधिक गट: सुंदर अय्यर/योगेश पंतसचिव वि.वि.उमेश भिडे/निखिल 6-1; खुला गट: रोहित शिंदे/नरहर गर्गे वि.वि.संतोष शहा/श्रीराम ओक 6-2; खुला गट: अमित लाटे/रोहन दळवी वि.वि.जयदीप वाकणकर/आशिष डिके 6-0).

महत्त्वाच्या बातम्या – 

६९ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महिला गटातील होतकरु मित्र मंडळाने अमर हिंदचा पराभव करत दुसरा दिवस गाजवला

जय शंकर क्रीडा मंडळ महिला व पुरुष गट जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा: होतकरू, जय बजरंग, जय खंडोबा यांना जेतेपद

एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए राष्ट्रीय मानांकन अजिंक्यपद स्पर्धेत देशभरांतून १०० खेळाडू सहभागी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---