---Advertisement---

विराट-रोहितला मिळणार खास निरोप, ‘या’ देशाने सुरू केली विशेष तयारी!

On: रविवार, जून 8, 2025 2:05 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Team india captain Rohit Sharma) 7 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून (Test cricket) निवृत्ती जाहीर केली. यानंतर 5 दिवसांनी सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) देखील (12 मे) रोजी कसोटीमधून निवृत्ती जाहीर केल्याची घोषणा केली. या दोन्ही दिग्गजानी टी-20 विश्वकप 2024 मध्ये विजय मिळवल्यानंतर टी 20 फॉरमॅटमधून देखील निवृत्ती घेतली होती. आता या दोन्ही स्टार खेळाडूंना ऑस्ट्रेलिया क्रिकेट शानदार निरोप समारंभ देण्याची तयारी करत आहे.

कसोटी फॉरमॅटमध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना चांगला निरोप मिळाला नाही. आता हे दोन्ही खेळाडू इंटरनॅशनल स्टेजवर फक्त वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही दिग्गज खेळाडू ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ शकतात, जिथे टीम इंडियाला 3 वनडे सामने खेळायचे आहेत. रिपोर्टनुसार क्रिकेट ऑस्ट्रेलिया या दौऱ्यावर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना निरोप समारंभ देण्याच्या तयारीत आहे. या दोन्ही खेळाडूंचा खेळाडू म्हणून हा कदाचित शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा असू शकतो. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया हा निरोप समारंभ अतिशय खास पद्धतीने आयोजित करण्याच्या तयारीत असेल.

भारतीय क्रिकेटसाठी त्यांचं सर्वस्व लावून खेळलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली आता त्यांच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत. अनेक रिपोर्ट नुसार दोन्ही खेळाडू वनडे विश्व कप 2027 दोन्ही खेळाडू हा विश्व कप जिंकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतात. विराट कोहली बद्दल बोलायचे झाल्यास, आयपीएल 2025 मध्ये त्याने त्याचा फॉर्म सिद्ध केला आहे. तसेच रोहित शर्माने देखील मुंबईसाठी महत्त्वाच्या सामन्यात चांगली कामगिरी केलेली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---