विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरूच आहे. भारतीय संघाने रविवारी (२२ ऑक्टोबर) शानदार कामगिरी करत न्यूझीलंडचा 4 विकेट्स राखून पराभव केला. दोन्ही संघांमधील हा सामना हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे झाला. त्याचवेळी प्रत्येक सामन्याप्रमाणे या सामन्यानंतरही भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे नाव जाहीर केले आणि यावेळी भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर विजयी झाला. अय्यरचा विजेता होण्याचा खुलासा एका खास पद्धतीने करण्यात आला होता, जो चाहत्यांना खूप आवडला होता आहे.
https://www.instagram.com/reel/CyugFmKocg5/?igshid=MzRlODBiNWFlZA==
बीसीसीआयने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, पदक देण्यापूर्वी टी दिलीपने सांगितले की, “आजच्या सामन्यात आम्ही काही झेल सोडले पण त्यानंतर आम्ही चांगले पुनरागमन केले आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले.”
यानंतर खास पद्धतीने श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला पदक देण्याची तयारी करण्यात आली. क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाने श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा करण्यासाठी स्पायडरकॅमचा वापर केला. या स्पायडरकॅमच्या माध्यमातून श्रेयस अय्यरचा फोटो खाली आणण्यात आला, जो पाहून भारतीय संघाचे सर्वच खेळाडू आनंदीत झाले. श्रेयसचा फोटो खाली येताच कुलदीप यादवने तो बाहेर काढला. तर रवींद्र जडेजाने अय्यरला पदक प्रदान केले.
अय्यरने मैदानावर न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हॉन कॉनवेचा शानदार झेल घेतला होता. याआधी गेल्या सामन्यात रवींद्र जडेजाला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक पदक मिळाले होते. मोठ्या पडद्यावर त्याला हे दाखवण्यात आले पण यावेळी प्रशिक्षकाने नवा मार्ग शोधला आणि स्पायडरकॅमद्वारे श्रेयस अय्यरचा फोटो मागवला. आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यांमध्ये विराट कोहली, शार्दुल ठाकूर, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि श्रेयस अय्यर यांना हे पदक मिळाले आहे.
Special revelation of India best fielder against New Zealand watch the video of the medal ceremony once
महत्वाच्या बातम्या –
बाजीगर चहल! SMAT ट्रॉफीमध्ये युझीची खळबळ, अवघ्या 58 धावांत गारद केला विरोधी संघ
BREAKING: क्रिकेटविश्वावर शोककळा! माजी भारतीय कर्णधार बिशनसिंग बेदी यांचे निधन