रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात झालेला आयपीएल २०२२चा एलिमिनेटर सामना अतिशय चित्तथरारक राहिला होता. ईडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीकडून रजत पाटीदार याने संघ कठीण परिस्थितीत असताना नाबाद ११२ धावा केल्या आणि १४ धावांनी हा सामना जिंकून देण्यात योगदान दिले. आरसीबीला क्वालिफायर २ मध्ये पोहोचवणाऱ्या २८ वर्षीय पाटीदारला मेगा लिलावात कोणीही खरेदी केले नव्हते. मात्र पुढे तो आरसीबीला चषकाच्या जवळ पोहोचवणारा मॅच विनर ठरला. याच रजतचा आज २९वा वाढदिवस आहे.
रजत पाटीदारवर कोणत्याही फ्रँचायझीने दाखवला नव्हता विश्वास
१२-१३ फेब्रुवारी रोजी बंगलोर येथे झालेल्या आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात (Unsold In Mega Auction) बरेचसे खेळाडू अनसोल्ड राहिले होते. यापैकी एक खेळाडू पाटीदारही होता, ज्याच्यावर कोणत्याही फ्रँचायझीने विश्वास दाखवला होता. मात्र २०२१ साली आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या पाटीदारच्या (Rajat Patidar) नशिबात काही वेगळेच लिहिलेले होते. आयपीएल २०२२च्या सुरुवातीच्या आठवड्यातच आरसीबीचा फलंदाज लवनिथ सिसोदिया दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आणि त्याचा पर्यायी खेळाडू म्हणून पाटीदार आरसीबीच्या ताफ्यात सहभागी झाला.
काही सामने बाकावर बसून काढल्यानंतर अखेर पाटीदारला २६ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळाली. या सामन्यात तो फक्त १६ धावा करू शकला. मात्र गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने अर्धशतकी खेळी केली. आता हंगामातील सातव्या सामन्यात धडाकेबाज शतक ठोकत (Rajat Patidar Century) तो संघाचा हुकुमी एक्का बनला आहे.
First uncapped player to score a century in the #PlayOffs. ✅
Joint fastest century in #IPL Playoffs. ✅
Fastest century in #IPL2022. ✅RISING up to the occasion and owning the stage. 🔥#PlayBold #WeAreChallengers #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/mcU9QH4VeS
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 26, 2022
कोण आहे रजत पाटीदार?
रजतचा जन्म १ जून १९९३ सालचा. मध्य प्रदेशातील इंदोर शहरातील तो रहिवासी आहे. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी त्याने क्लब क्रिकेट खेळायला सुरू केले होते. आपल्या नातूमधील क्रिकेटप्रती ओढ व कौशल्य पाहून त्याच्या आजोबांनी त्याला जवळच्या क्रिकेट अकादमीत भरती केले होते. एक गोलंदाज म्हणून आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करणारा पाटीदार १५ वर्षांखालील क्रिकेट खेळताना फलंदाज बनला. त्याच्या प्रशिक्षकाने त्याच्यातील फलंदाजीचे गुण हेरले आणि त्याला फलंदाज बनवले.
देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये मध्यप्रदेश संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पाटीदारने, सैयद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत अवघ्या ५१ चेंडूत ९६ धावांची खेळी केली होती. या स्पर्धेत त्याने आणखी एक महत्त्वाची खेळी केली होती. त्याने अवघ्या २९ चेंडूत ६८ धावा चोपल्या होत्या. हा फलंदाज चौफेर फटकेबाजी करण्यास सक्षम आहे. त्यामुळे मधल्या षटकांमध्ये येऊन तो संघासाठी महत्वपूर्ण धावा करू शकतो.
4s: 1️⃣2️⃣
6s: 7️⃣
S/r: 2️⃣0️⃣7️⃣.4️⃣0️⃣🔥An innings we’ll never forget. 🤩
Take a bow, Rajat! 🙌🏻#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #LSGvRCB #PlayOffs pic.twitter.com/5QG0ls3tdM— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 25, 2022
त्याने २०१५-१६ हंगामातून रणजी ट्रॉफी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. जानेवारी २०१८ मध्ये त्याने झोनल टी२० लीगमध्ये मध्य प्रदेशसाठी पहिला टी२० सामना खेळला होता. २०१८-१९ हंगामात त्याने रणजी ट्रॉफी क्रिकेटमध्ये मध्य प्रदेश संघासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. या हंगामात त्याने ८ सामने खेळताना ७१४ धावा फटकावल्या होत्या.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दु:खद! इंग्लंडच्या माजी यष्टीरक्षकाचे निधन, क्रिकेट कारकिर्दीत केल्या होत्या ४० हजार धावा
दीपक चाहर आणि जयाच्या लग्नाची तयारी जोरात, संगीत अन् मेहंदी कार्यक्रमातील Photo होतायत व्हायरल
क्रिकेटर्स मॅचवेळी काय खातात माहित आहे का? घ्या जाणून