मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात चेन्नई येथे झालेला आयपीएल २०२१ चा पहिला सामना अतिशय रोमहर्षक ठरला. धाकधूक वाढलेला हा सामना शेवटी २ विकेट्सने जिंकत बेंगलोरने हंगामाची विजयी सुरुवात केली. दरम्यान बेंगलोरचा नवोदित वेगवान गोलंदाज कायल जेमिसन याच्या अप्रतिम चेंडूने मुंबईचा धाकड अष्टपैलू कृणाल पंड्या याची बॅट तोडली.
मुंबईच्या डावातील १९ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या जेमिसनच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर कृणालने जबरदस्त चौकार मारला. परंतु जेमिसनचा पाय क्रिजवरील सीमरेषेच्या थोडा पुढे गेल्याने पंचांनी तो नॉल घोषित केला आणि मुंबईला फ्री हिट मिळाली. यावेळी फटकेबाजी करण्यात माहीर असलेल्या कृणालेही फ्री हिटचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु जेमिसनने अतिशय चतुराईने जबरदस्त यॉर्कर टाकला. यावर कृणालने मोठा फटका मारण्यासाठी बॅट फिरवली आणि बॅटचे चक्क दोन तुकडे झाले.
#MIvsRCB pic.twitter.com/1xOImUDxqQ
— Ankush Dhavre (@AnkushDhavre) April 9, 2021
आयपीएल पदार्पणात अविश्वसनीय गोलंदाजी करत जेमिसनने आयपीएलप्रेमींच्या मनात जागा मिळवली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच आयपीएल खेळत असलेला हा २६ वर्षीय क्रिकेटपटू नक्की आहे तरी कोण?, हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. चला तर जाणून घेऊया..
तब्बल ६ फुट ८ इंच उंची असणाऱ्या जेमिसनसाठी आयपीएल २०२१ लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघात या दोन संघात खुप वेळ चुरस सुरु होती. दोघांनाही जेमिसन हवा होता. पण अखेर बेंगलोरने १५ कोटींची बोली लावत जेमिसनला संघात सामील करुन घेतले होते.
कसोटी पदार्पणात मिळवली होती विराटची विकेट
जेमिसनने कसोटी पदार्पण भारताविरुद्ध केले होते. यावेळी त्याने भारताचा कर्णधार विराट कोहलीची २ धावांवर विकेट घेतली होती. याच सामन्यात भारताचे कसोटी स्पेसलिस्ट चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी त्याचे शिकार ठरले होते. त्याने ११ धावांवर पुजारा आणि ७ धावांवर विहारीला पव्हेलिनयला पाठवले होते.
जेमिसनचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पणही अविस्मरणीय
जेमिसनने ८ फेब्रुवारी २०२० ला भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यातून वनडेबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळीही त्याने शानदार कामगिरी करताना नाबाद २५ धावा केल्या होत्या आणि २ विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी त्याने पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनीची विकेट घेतली होती. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.
जेमिसनची टी२० कारकिर्द
जेमिसनने त्याच्या कारकिर्दीत ८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून यात त्याने ४ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने ३८ ट्वेंटी-ट्वेंटी सामने खेळले असून ५४ विकेट्स घेतल्या आहेत.
अशी आहे जेमिसनची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी
जेमिसनने देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे. ऑकलंड संघाकडून जेमिसनने एकूण ३४ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर १२८ विकेट्स आहेत. तर, एका सामन्यात १० वेळा ५ विकेट्स घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. तसेच, अ दर्जाच्या ३३ सामन्यात त्याने ४२ विकेट्स घेतल्या आहेत.
न्यूझीलंडचा सर्वात उंच गोलंदाज
जेमिसन क्रिकेटमधील सर्वाधिक उंची असणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे. त्याची ६ फूट ८ इंच एवढी उंची आहे. तसेच तो न्यूझीलंडचा सर्वात उंच क्रिकेटपटू आहे. त्याला त्याच्या उंचीमुळे उसळणाऱ्या खेळपट्टीवर गोलंगाजी करताना स्विंगबरोबरच अतिरिक्त उसळीही मिळते.
महत्त्वाच्या बातम्या-
बलाढ्य MI साठी कर्दनकाळ ठरला हर्षल; सामना विजयानंतर म्हणाला, ‘मला आधीच कल्पना आली होती…’