एमपीएलचा तिसरा हंगाम 4 जूनपासून सुरू होत आहे. 34 सामन्यांच्या या हंगामात एकूण 6 संघ खेळताना दिसतील. एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या लीगमध्ये दरवर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण पाहायला मिळते. यंदा उद्घाटन सामन्यात अनेक गोष्टी पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहेत.
2023 च्या विश्वचषक फायनल अहमदाबाद येथे झाली होती. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील त्या सामन्यानंतर झालेल्या ड्रोन शोची चर्चा संपूर्ण जगभरात झाली होती. अगदी तसाच भव्य ड्रोन शो यंदा पुण्यात होणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा शो सादर केला जाईल. तसेच, आयपीएलप्रमाणे लाईट शो देखील होणार आहे. (Spectacular Drone Show Planned for MPL 2025 Inauguration, Similar to 2023 World Cup)
“विश्वचषकात झालेल्या ड्रोन शो प्रमाणेच एमपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात भव्य ड्रोन शो सादर होईल. त्याचबरोबर काही कलाकारांचे डान्स परफॉर्मन्सदेखील होतील. आयपीएलच्या धर्तीवर लाईट शोदेखील होणार आहे. प्रवेश सर्वांसाठी मोफत असल्यामुळे, सर्वांनी उद्घाटन सोहळा व सामने पाहण्यासाठी नक्की यावे,” असे आवाहन एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी सोलापूर येथे केले. (MPL 2025 Schedule: Maharashtra Premier League Starts from June 4)
फॅन्ससाठी प्रवेश मोफत
या स्पर्धेतील सर्व सामने पुण्यातील गहुंजे येथील एमसीए इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, सर्व प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मोफत प्रवेश मिळेल. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या आवडत्या संघांना व खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे. (Maharashtra Premier League 2025: Free Stadium Entry, Grand Drone Show at Opening Ceremony)
मोबाईलवरही पाहता येणार सामने
हे सर्व सामने JioCinema (JioHotstar) या OTT प्लॅटफॉर्मवर आणि Star Sports 2 या टीव्ही वाहिनीवर थेट प्रक्षेपित केले जातील. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या देखील ही रोमांचक स्पर्धा पाहण्याची संधी मिळणार आहे. (Where to Watch MPL 2025: Live on Star Sports 2 and JioCinema)






