भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi t20 & odi series) यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ६ फेब्रुवारीला सुरू होणार आहे. उभय संघातील एकदिवसीय मालिका टी-२० मालिकेच्या आधी खेळली जाईल. आता याच एकदिवसीय मालिकेविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे. उभय संघातील एकदिवसीय मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जाणार आहे आणि प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थिती नाकरण्यात आली आहे. मात्र टी-२० मालिकेसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परावानगी दिली गेली आहे.
कोरोना माहामारीच्या कारणास्तव बीसीसीआयने टी-२० आणि एकदिवसीय मालिका दोन वेगवेगळ्या स्टेडियमवर आयोजित केल्या आहेत. त्यापूर्वीच्या नियोजनानुसार दोन्ही मालिकेतील सहा सामने सहा वेगवेगळ्या स्टेडियमवर खेळवले जाणार होते, पण नंतर यामध्ये बदल केला गेला.
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील टी-२० मालिका कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळली जाणार आहेत. टी-२० मालिकेतील पश्चिम बंगाल सरकारकडून ७५ टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेशाची परवानगी दिली गेली आहे. परंतु एकदिवसीय मालिकेसाठी मात्र प्रेक्षकांना परवानगी नाकरण्यात आली आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा- तब्बल १४ हंगामात खोऱ्याने पैसा ओढला, १५व्या मोसमातही नोंदवलंय नाव! तो एकलाची एक ‘असा’ परदेशी खेळाडू
६ फेब्रुवारीला खेळला जाणारा वेस्ट इंडीजविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना भारतीय संघासाठी खास ठरणार आहे. भारतीय संघासाठी हीृा त्यांचा १००० वा एकदिवसीय सामना असेल. या आकड्यापर्यंत पोहोचलेला भारत एकमेव संघ बनणार आहे. परंतु या सामन्यापूर्वीच ही निराशा करणारी बातमी समोर आली आहे. जे चाहते हा ऐतिहासिक एकदिवसीय सामना मैदानात जाऊन पाहू इच्छित होते, त्यांना आता घरी बसूनच सामन्याचा आनंद घ्यावा लागेल. एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये प्रेक्षकांना परवानगी नाकरली गेली आहे.
एकदिवसीय मालिका (नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद)
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज पहिला एकदिवसीय सामना – ६ फेब्रुवारी
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसरा एकदिवसीय सामना – ९ फेब्रुवारी
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज तिसरा एकदिवसीय सामना – ११ फेब्रुवारी
टी-२० मालिका (ईडन गार्डन, कोलकाता)
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज पहिला टी-२० सामना – १६ फेब्रुवारी
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसरा टी-२० सामना – १८ फेब्रुवारी
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज तिसरा टी-२० सामना – २० फेब्रुवारी
एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हूडा, वाशिंगटन सुंदर, लोकेश राहुल, रिषभ पंत, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान.
एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेला वेस्ट इंडीज संघ –
कीरोन पोलार्ड (कर्णधार), डॅरेन ब्रावो, शामारह ब्रुक्स, ब्रँडन किंग, फेबियन एलन, न्क्रूमाह बुनेर, जेसन होल्डर, शाइ होप, निकोलस पूरन, अकील होसैन, अल्ज़ारी जोसफ, केमर रोच, रोमारियो शेफर्ड, ओडीन स्मिथ, हेडेन वाल्श
महत्वाच्या बातम्या –
ठरलं तर! आयपीएल २०२२ साठी तब्बल ५९० खेळाडूंचा होणार लिलाव; ‘या’ स्टार क्रिकेटपटूंचा समावेश
“इतकी उत्सुकता वाढवायची काय गरज” लखनऊ संघाच्या लोगोचे अनावरण होताच चाहत्यांनी केले ट्रोल
आयपीएलच्या इतिहासातील ५ खोट्या गोष्टी चाहत्यांना वाटतात खऱ्या, जाणून घ्या त्यामागचे सत्य