---Advertisement---

सीएसकेला मिळाली नॅथन एलिसची रिप्लेसमेंट, ऑस्ट्रेलियाच्या पेसरची पीएसएलमधून माघार अन् आयपीएलमध्ये एंट्री

On: मंगळवार, मार्च 24, 2026 6:40 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) आज (मंगळवार, २४ मार्च) दुखापतग्रस्त नॅथन एलिस याच्या जागी एका पर्यायी खेळाडूची निवड केली आहे. एलिसचा पर्याय म्हणून डावखुरा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन १.५ कोटी रुपयांच्या मोबदल्यात सीएसके संघात सामील होणार आहे. सीएसकेच्या या बदली खेळाडूसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मान्यता दिली आहे.

वेगवान गोलंदाज जॉन्सनने ऑस्ट्रेलियासाठी १३ आंतरराष्ट्रीय सामने (५ वनडे आणि ८ टी-२० सामने) खेळले आहेत. त्यामध्ये त्याने १८ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये याआधी त्याने गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. एलिस हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झाला होता. जॉन्सनला आता या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. त्याने २०२५ चा हंगाम केकेआरकडून खेळला होता, त्यामध्ये त्याची कामगिरी म्हणावी तशी झाली नाही. त्याने ४ सामने खेळले आणि एकच विकेट घेतली होती.

तसेच जॉन्सन सीएसकेकडून या हंगामात खेळणारा तो दुसरा विदेशी वेगवान गोलंदाज आहे. संघात आधीच न्यूझीलंडचा मॅट हेन्री आहे. जॉन्सनच्या आधी दक्षिण आफ्रिकेचा ओटनील बार्टमन सीएसकेमध्ये सामील होणार अशी चर्चा होती. कारण बार्टमन यानेही पीएसएलमधून माघार घेतली होती आणि सीएसके एलिसच्या बदली खेळाडूच्या विचारात होते. आता एलिसच्या जागी जॉन्सन खेळणार हे निश्चित झाले आहे.

जॉन्सन २०२६ च्या आयपीएल हंगामाच्या लिलावात अनसोल्ड राहिला होता. नंतर त्याला पाकिस्तान सुपर लीग २०२६ च्या हंगामासाठी क्वेटा ग्लॅडिएटर्सने करारबद्ध केले होते. आता पुन्हा तो आयपीएलमध्ये खेळणार आहे. यामुळे तो ही आता दसून शनाका, ब्लेसिंग मुझारबानी यांच्या यादीत सामील झाला आहे.

शनाका आणि मुझारबानी यांनीही पीएसएलचा करार रद्द करत आयपीएलमध्ये खेळण्यास पसंती दर्शवली आहे. आयपीएलमध्ये शनाका राजस्थान रॉयल्स आणि मुझारबानी कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार आहेत.

आयपीएल २०२६ मध्ये सीएसकेचा पहिला सामना ३० मार्चला राजस्थान रॉयल्सविरुद्ध आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---