---Advertisement---

आजच्या सामन्यात कुलदीप यादव खेळला तर पाकिस्तानचं काही खरं नाही! आकडेवारीवरून समजून घ्या

On: रविवार, जून 9, 2024 11:09 AM
Kuldeep-Yadav
---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज (9 जून) टी20 विश्वचषकाचा 19 वा सामना रंगणार आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत.

टी20 मध्ये पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा रेकॉर्ड चांगला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करू शकतो. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. कुलदीप जर प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल तर पाकिस्तानच्या अडचणी वाढू शकतात.

पाकिस्तानविरुद्ध कुलदीप यादवचा रेकॉर्ड खूपच चांगला आहे. कुलदीपनं पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत 6 वनडे सामने खेळले, ज्यात त्यानं 12 विकेट्स घेतल्या आहेत. 25 धावांत 5 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. कुलदीपला अद्याप पाकिस्तानविरुद्ध टी20 सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. मात्र तो आज न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरू शकतो.

न्यूयॉर्कची खेळपट्टी संथ आहे, जी फिरकी गोलंदाजांना मदत करते. कुलदीप यादव नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये शानदार फार्मात होता. त्या कामगिरीच्या जोरावर त्याची विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली. कुलदीप आता अमेरिकेतही आपला शानदार फार्म जारी राखण्याचा प्रयत्न करेल.

टीम इंडिया ज्या खेळपट्टीवर खेळणार आहे ती अतिशय संथ आहे. त्यामुळे भारत-पाक सामना लो स्कोअरिंग होऊ शकतो. अशा स्थितीत टीम इंडिया फिरकीपटूंवर अवलंबून राहू शकते. कुलदीपशिवाय भारतीय संघ अक्षर पटेललाही प्लेइंग 11 मध्ये संधी देऊ शकतो. गोलंदाजीसोबतच अक्षर फलंदाजीतही निष्णात आहे.

कुलदीप यादवची टी20 आंतरराष्ट्रीय कामगिरी पाहिली तर ती देखील उत्कृष्ट राहिली आहे. कुलदीपनं आतापर्यंत 35 टी20 सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं 59 विकेट्स घेतल्या आहेत. 17 धावांत 5 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. कुलदीपच्या एकूण टी20 कामगिरीवर नजर टाकली, तर त्यानं156 सामन्यांमध्ये 190 विकेट घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

आरसीबी फॅन्ससाठी आनंदाची बातमी! युगांडाचा संघ अवघ्या 39 धावांवर ऑलआऊट
“तेल लगाओ डाबर का, विकेट गिराओ बाबर का”, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी रिषभ पंत काय बोलून गेला?
विश्वचषकातील सर्वात मोठ्या लढतीत भारत-पाकिस्तान आमनेसामने! कोणता संघ ठरेल वरचढ? संपूर्ण स्क्वॉड Analysis

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---