भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील इंदोर कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकीपटू नेथन लायन याने जबरदस्त कामगिरी केली आहे. लायनने तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताविरुद्ध इतिहास रचला आहे. लायनने गिलची विकेट घेत इतिहास रचला आहे. तसेच, तो भारताविरुद्ध सर्वात यशस्वी फिरकीपटू बनला आहे. याबाबतीत त्याने श्रीलंकेचा दिग्गज मुथय्या मुरलीधरन याचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. खरं तर, या सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव 109 धावांवर संपुष्टात आला होता. तसेच, ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 197 धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला शुबमन गिल याच्या रूपात 15 धावांवर पहिली विकेट गमावली होती.
शुबमन गिल (Shubman Gill) याच्या विकेटसह नेथन लायन (Nathan Lyon) याने भारताविरुद्ध 106 विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला. तो भारताविरुद्ध सर्वात विकेट्स घेणारा फिरकीपटू बनला आहे. त्याच्यापूर्वी हा विक्रम मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) याच्या नावावर होता. त्याने भारताविरुद्ध 105 विकेट्स घेतल्या होत्या.
https://twitter.com/ICC/status/1631196576533078016
भारताविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारे यशस्वी फिरकीपटू
नेथन लायन- 106 विकेट्स*
मुथैया मुरलीधरन- 105 विकेट्स
लान्स गिब्स- 63 विकेट्स
डेरेक अंडरवूड- 62 विकेट्स
There we go! Lyon opens the account for the Australian bowlers, cleaning up Gill.#INDvAUS
— cricket.com.au (@cricketcomau) March 2, 2023
दुसरीकडे भारताविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं, तर या यादीत अव्वलस्थानी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) आहे. त्याने 139 विकेट्स घेतल्या आहेत.
भारताविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
जेम्स अँडरसन- 139 विकेट्स
नेथन लायन- 106 विकेट्स*
मुथय्या मुरलीधरन- 105 विकेट्स
इमरान खान- 94 विकेट्स
माल्कम मार्शल- 76 विकेट्स
कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाकडे चांगली धावसंख्या उभारण्याची संधी होती. पहिल्या दिवशीच्या शेवटी ऑस्ट्रेलियाने 156 धावा करत 4 विकेट्स गमावल्या होत्या. पीटर हँड्सकॉम्ब आणि कॅमरून ग्रीन यांच्या जोडीने चांगली सुरुवात देत पहिल्या तासाभरात 30 धावा केल्या होत्या. मात्र, हँड्सकाम्बची विकेट पडताच ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.
एकेवेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 4 विकेट्सच्या नुकसानीवर 186 इतकी होती. मात्र, आर अश्विन आणि उमेश यादव यांच्या घातक गोलंदाजीमुळे 29 मिनिटातच ऑस्ट्रेलिया संघ 197 धावांवर सर्वबाद झाला. यावेळी अश्विन आणि उमेशच्या जोडीने प्रत्येकी 3 विकेट्स चटकावल्या. दुसरीकडे, पहिल्या दिवशी रवींद्र जडेजा याने 4 विकेट्स घेण्याचा कारनामा करून दाखवला होता. (spinner nathan lyon broke muttiah muralitharan world record to become the highest test wicket taker against india)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी कर्णधार असतो, तर त्याच्यासाठी…’, फ्लॉप ठरत असलेल्या राहुलला मिळाला आणखी एका दिग्गजाचा पाठिंबा
वडिलांना गमावल्यानंतर खचला नाही उमेश, पुनरागमन करताच गाठली बळींची ‘शंभरी’, आता लक्ष्य नव्या रेकॉर्डवर