Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लायनचा नाद सोड बाबा! ‘या’ भारतीय धुरंधराला तब्बल 12 वेळा गमवावी लागलीय विकेट, कोण आहे तो कमनशिबी?

लायनचा नाद सोड बाबा! 'या' भारतीय धुरंधराला तब्बल 12 वेळा गमवावी लागलीय विकेट, कोण आहे तो कमनशिबी?

March 1, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Cheteshwar-Pujara

Photo Courtesy: Twitter/ICC


बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023मधील तिसऱ्या कसोटी सामन्याला बुधवारपासून (दि. 1 मार्च) इंदोर येथे सुरुवात झाली आहे. मात्र, पहिल्या दोन सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला तिसऱ्या कसोटीत संघर्ष करावा लागत आहे. नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्मा याने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यावेळी भारतीय संघाची अशी खराब सुरुवात होईल, याची कुणी कल्पनाही केली नव्हती. भारतीय संघाच्या सलामीवीरांनी 8 षटकांच्या आत झटपट विकेट्स गमावल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या चेतेश्वर पुजारा यालादेखील चांगली कामगिरी करता आली नाही. तो अवघ्या एका धावेवर बाद झाला. यावेळी त्याच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला.

भारतीय संघाच्या डावातील 9वे षटक सुरू होते. हे षटक ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नेथन लायन (Nathan Lyon) टाकत होता. या षटकातील दुसऱ्या चेंडूवेळी स्ट्राईकवर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) होता. लायनने चेंडू फेकताच पुजाराही गोंधळात पडला. त्याने आधी पाय बाहेर काढला, पण परत एक पाऊल मागे जाऊन चेंडू ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत खूप वेळ झाला होता. चेंडूला उसळी भेटली नव्हती. अशात चेंडू बॅट आणि पॅडला सोडून मधल्या स्टंपवर जाऊन लागला. त्यामुळे पुजाराला यावेळी फक्त 1 धाव काढून तंबूत परतावे लागले. यामुळे त्याच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला.

Nathan Lyon joins the party as India lose Cheteshwar Pujara for 1 ☝️#WTC23 | #INDvAUS | 📝 https://t.co/FFaPxt9fIY pic.twitter.com/aqppq34C4H

— ICC (@ICC) March 1, 2023

पुजाराचा नकोसा विक्रम
पुजारा कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 12 वेळा नेथन लायनच्या फिरकीचा शिकार बनला आहे. यापूर्वी तो इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने त्याला डझनभर वेळा शिकार बनवले होते. पुजाराव्यतिरिक्त या यादीत भारताचे महान दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यांनी कसोटीत 12 वेळा इंग्लंडच्या डेरेक अंडरवूड गोलंदाजाविरुद्ध 12 वेळा विकेट गमावली होती.

भारताचा पहिला डाव
भारतीय संघाने 29 षटकात 88 धावांवर 8 विकेट्स गमावल्या होत्या. त्यात रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर, श्रीकर भरत आणि आर अश्विन यांचा समावेश होता. यापैकी फक्त विराट (22), शुबमन (21), भरत (17) आणि रोहित (12) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली.

केएल राहुल बाहेर
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने सांगितले की, या सामन्यातून सलामी फलंदाज केएल राहुल याला बाहेर काढण्यात आले आहे. त्याच्या जागी शुबमन गिल याला संधी मिळाली आहे. तसेच, मोहम्मद शमी बाहेर पडला असून त्याच्या जागी उमेश यादव याला ताफ्यात सामील केले आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स हा कौटुंबिक कारणामुळे मायदेशात परतला आहे. त्याच्या जागी मिचेल स्टार्क याला संघात संधी दिली गेली आहे. तसेच, दुखापतग्रस्त डेविड वॉर्नरच्या जागी कॅमरून ग्रीन याला संघात घेतले आहे. (cricketer cheteshwar pujara dismissed by lathon lyon 12th time in test cricket)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्लेइंग इलेव्हनमधून केएल राहुल अखेर बाहेर, संघ व्यवस्थापनाला का घ्यावा लागला निर्णय?
टीम इंडियाच्या अतिआत्मविश्वासाला ऑस्ट्रेलियाकडून लगाम, 50 धावांत निम्मा संघ बाद, ‘हे’ बहाद्दर तर शून्यावर तंबूत


Next Post
australia

तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने उडवली भारतीय संघाची दाणादाण, फक्त 'एवढ्या' धावांवर खेळ खल्लास

Matthew-Kuhnemann

भारतात येऊन भारताविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा मॅथ्यू दुसराच ऑस्ट्रेलियन, 2004मध्ये घडलेला विक्रम

KL Rahul Venkatesh Prasad

राहुलला संघातून वगळल्यानंतर वेंकटेश प्रसाद चर्चेत, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143