भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याती बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या चालू हंगामात भारताचे पारडे जड दिसत आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवून 2-0 अशी आघाडी घेतली. नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने सुमार प्रदर्शन केले. पण कसोटी पदार्पण करणाऱ्या टॉड मार्फी याने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. पदार्पणाच्या सामन्यात अशी अप्रतिम कामगिरी करणाऱ्या मर्फीचे ब्रेट ली याने तोंड भरून कौतुक केले.
नाथन लायन (Nathan Lyon) ऑस्ट्रेलियन संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज आहे. लायनने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत 117 कसोटी सामने खेळले आहेत आणि यात 468 विकेट्स घेतल्या आहेत. लायन सध्या 35 वर्षांचा आहे आणि लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो. अशात येत्या काळात ऑस्ट्रेलिया संघाला एका अशा फिरकी गोलंदाजाची आवश्यकता आहे, जो संघाला एकट्याच्या जोरावर विजय मिळवून देईल आणि नाथन लायनची कमी जागा घेईल. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ब्रेट ली (Brett Lee) याच्या मते टॉड मर्फी (Todd Murphy) भविष्यात संघातील नाथन लायनची जागा घेऊ शकतो.
ब्रेट ली याच्या मते ऑस्ट्रेलियन संघाचा पुढचा दिग्गज फिरकीपटू टॉड मर्फी बनू शकतो. याविषयी चर्चा करताना ब्रेट ली म्हणाला, “नाथन लायन नंतर कोण? ऑस्ट्रेलियाला संघाला या प्रश्नाचे उत्तर 22 वर्षीय युवा ऑफ स्पिनर टॉड मर्फीच्या रूपात मिळाल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रेलियाकडून त्यांनी चांगली सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलिया मोठ्या अंतराने पराभूत झाला, पण मर्फीने जगाला दाखवून दिले की, तुम्हा माझ्यावर नजर ठेवू शकता.”
“नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियन संघ फक्त एकदाज गोलंदाजीसाठी आला. त्यातही टॉड मर्फीने 7 विकेट्स घेतल्या. यात विकेट्समध्ये जास्त फलंदाजच होते. त्याने आर अश्विन, केएल राहुल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि रविंद्र जडेजा अशात प्रतिभावान फलंदाजांच्या विकेट्स घेतल्या. खरोखर हे खूपच चांगले पदार्पण होते आणि आपल्या कुटुंबाच्या उपस्थितीमध्ये त्याने हे प्रदर्शन केले आहे. नागपूर कसोटी सामन्यासाठी त्याचे कुटुंबीय तिथे होते.” टॉड मर्फीने दिल्ली कसोटी सामन्यातही चांगली गोलंदाजी केली, पण त्याला जास्त विकेट्स घेता आल्या नाही. पण दिल्ली कसोटीत त्याने पुन्हा एकदा दिग्गज विराटची विकेट घेतली. दरम्यान, उभय संघांतील तिसरा कसोटी सामना 1 मार्च रोजी इंदोरच्या होळकर स्टेडियमवर सुरू होईल. (Who after Nathan Ellis? Brett Lee picked the future legendary spinner of the Australian team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘जडेजाने माझा सल्ला न ऐकून बरे केले’, भारतीय दिग्गजाकडून जुन्या घटनेला उजाळा
तिसऱ्या पीवायसी कॅरम लीग 2023 स्पर्धेत थॉर, ब्लॅक पँथर्स संघांची विजयी सलामी