अफगाणिस्तानचा स्टार अष्टपैलू राशीद खान (Rashid Khan) सध्या इंग्लंडच्या ‘द हंड्रेड’ लीगमध्ये खेळत आहे. याच स्पर्धेत किरॉन पोलार्डनं (Keiron Pollard) राशिदला सलग 5 षटकार ठोकले. आता राशिदच्या दुखापतीची बातमी समोर आली आहे. राशिद या स्पर्धेत ट्रेंट रॉकेट्स संघाचा भाग आहे. राशिदच्या दुखापतीची माहिती संघाच्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे शेअर करण्यात आली. त्याची दुखापत अफगाणिस्तानसाठी मोठी समस्या बनू शकते कारण अफगाणिस्तानला पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामना खेळायचा आहे.
अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान भारतातील ग्रेटर नोएडा येथे खेळवला जाणार आहे. आता राशिद खान (Rashid Khan) न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात सहभागी होऊ शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे. ट्रेंट रॉकेट्सने राशीदला कोणती दुखापत झाली आहे हे स्पष्ट केलं नाही. ट्रेंट रॉकेट्सच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “दुखापतीमुळे राशिद खान उर्वरित द हंड्रेड स्पर्धेतून बाहेर पडला आहे.”
राशिदच्या जागी ट्रेंट रॉकेट्सनं ख्रिस ग्रीनचा (Chris Green) संघात समावेश केला आहे. ख्रिस ग्रीन (Chris Green) हा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू आहे. त्यानं ऑस्ट्रेलियासाठी 1 टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. ख्रिस हा फिरकीपटू आहे. 30 वर्षीय ख्रिसनं डिसेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी एकमेव टी20 खेळला होता. यानंतर तो पुन्हा ऑस्ट्रेलिया संघात स्थान मिळवू शकला नाही.
राशिद खानच्या कसोटी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं अफगाणिस्तानसाठी कसोटीमध्ये भारताविरुद्ध 2018 मध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून त्यानं अफगाणिस्तानसाठी 5 कसोटी सामने खेळले. त्यामध्ये 7 डावात फलंदाजी करताना त्यानं 15.14च्या सरासरीनं 106 धावा केल्या. यादरम्यान त्यानं 1 अर्धशतक झळकावलं, तर त्याची सर्वोच्च धावसंख्या 51 राहिली. 5 सामन्यांच्या 9 डावात गोलंदाजी करताना त्यानं 34 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याचा इकाॅनाॅमी रेट 2.97 आणि सरासरी 22.35 राहिला आहे. कसोटीमध्ये एका सामन्यात त्यानं सर्वोच्च 11 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पुढचे ऑलिम्पिक कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर
पाकिस्तानात होणार नाही चॅम्पियन्स ट्राॅफी? दिग्गज खेळाडूनं सांगितलं मोठं कारण
पुणे फुटबाॅल: रूपाली एससीचा सहज विजय