वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (दि. 12 जुलै) डॉमिनिका येथील विंडसर पार्क मैदानावर पहिल्या कसोटीला सुरुवात झाली. या सामन्यातू दोन भारतीय युवा खेळाडूंनी कसोटी पदार्पण केले. त्यातील एक म्हणजे यशस्वी जयसवाल होय. त्याच्याविषयी दिग्गज फिरकीपटू आर अश्विन याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. अश्विन म्हणाला की, जयसवाल खूपच उत्साही खेळाडू असून तो दीर्घकाळ भारतीय क्रिकेटची सेवा करेल. अश्विनच्या मते, संघ त्याच्यासाठी योग्य वातावरण ठेवण्याचा संघ प्रयत्न करत आहे.
‘आशा आहे यशस्वी जयसवाल दीर्घ काळ खेळेले’
आर अश्विन (R Ashwin) याने यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याचे तोंडभरून कौतुक केले. युवा फलंदाजाविषयी बोलताना अश्विन म्हणाला की, “अखेरच्या षटकातील पहिला चेंडू यशस्वी जयसवालने रिव्हर्स स्वीप खेळला. तुम्ही त्याच्याकडून हीच अपेक्षा ठेवू शकता. तो खूपच उत्साही आहे आणि आशा आहे की दीर्घकाळ खेळेल. आम्ही आशा करत आहोत की, त्याच्यासाठी वातावरण चांगला ठेवू.”
5⃣0⃣-run stand! ????#TeamIndia off to a solid start, courtesy Captain @ImRo45 & debutant @ybj_19 ????
Follow the match ▶️ https://t.co/FWI05P4Bnd #WIvIND pic.twitter.com/ys9kkbWh93
— BCCI (@BCCI) July 12, 2023
यशस्वी नाबाद 40
वेस्ट इंडिजविरुद्धच्या डॉमिनिका कसोटी (Dominica Test) सामन्यात यशस्वी जयसवाल याने पदार्पण केले. सलामीला उतरलेला जयसवाल अजूनही नाबाद 40 धावांवर खेळत आहे. त्याने पहिल्या दिवशी शानदार फलंदाजी केली. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हादेखील नाबाद 30 धावांवर खेळतोय. आता दुसऱ्या दिवशीही दोघेही मोठी धावसंख्या उभारून संघाला मजबूत स्थितीत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील.
Congratulations to Yashasvi Jaiswal and Ishan Kishan who are all set to make their Test debut for #TeamIndia.
Go well, lads!#WIvIND pic.twitter.com/h2lIvgU6Zp
— BCCI (@BCCI) July 12, 2023
अश्विनच्या सर्वाधिक विकेट्स
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन केले. यजमान संघाला अवघ्या 150 धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. यावेळी आर अश्विन (R Ashwin) याने शानदार गोलंदाजी करत 60 धावा खर्चून सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. त्यामुळे तो कसोटीत एका डावात 5 विकेट्स घेण्याची ही त्याची 33वी वेळ होती. त्याच्याव्यतिरिक्त रवींद्र जडेजा याने 26 धावा खर्चून 3 विकेट्स घेतल्या. तसेच, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (spinner ravichandran ashwin reacts on yashasvi jaiswal test debut wi vs ind know here)
महत्वाच्या बातम्या-
यशस्वी-रोहितकडून 40 वर्षे जुन्या इतिहासाची पुनरागवृत्ती, गावसकर-शास्त्रींशी मोठे कनेक्शन; वाचा लगेच
हुश्श! ईशानच्या हातातून निसटलेला चेंडू, पण स्वत:ला सावरत दुसऱ्या हाताने टिपला अफलातून झेल, Video