प्रत्येक कसोटी सामन्यात खेळाडू एकापेक्षा एक विक्रम आपल्या नावावर करत असतात. खेळाडूंकडे प्रत्येक सामन्यात नवीन विक्रम रचण्याचा आणि मोडण्याची संधी असते. आता अशीच संधी भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन याच्याकडे आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना बुधवारपासून (दि. 12 जुलै) डॉमिनिका येथे खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. अशात या सामन्यात अश्विनकडे भीमपराक्रम रचण्याची संधी आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (West Indies vs India) संघातील पहिल्या कसोटी सामन्यात आर अश्विन (R Ashwin) मोठा विक्रम रचू शकतो. असा विक्रम भारताचे माजी कर्णधार आणि अष्टपैलू कपिल देव यांनीही त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत केला नव्हता. भारताचा दिग्गज फिरकीपटू अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 3 विकेट्स घेतल्या, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आर अश्विन 700 विकेट्स (R Ashwin 700 Wickets) पूर्ण करेल. आतापर्यंत भारतासाठी फक्त अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांनीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700हून अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
अश्विनकडे मोठा विक्रम रचण्याची संधी
रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 700हून अधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज बनेल. सध्या अश्विनच्या नावावर कसोटी, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून एकूण 697 विकेट्सची नोंद आहे. अश्विनने जर वेस्ट इंडिजविरुद्ध 3 विकेट्स घेतल्या, तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 700 विकेट्स पूर्ण करेल. भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स अनिल कुंबळे (956) याने घेतल्या आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानी हरभजन सिंग असून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 711 विकेट्स घेतल्या आहेत. (ravichandran ashwin set to records 700 international wickets in ind vs wi dominica test match)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज
956 विकेट्स- अनिल कुंबळे
711 विकेट्स- हरभजन सिंग
697 विकेट्स- आर अश्विन*
687 विकेट्स- कपिल देव
कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
800 विकेट्स- मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका
708 विकेट्स- शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)
688 विकेट्स- जेम्स अँडरसन (इंग्लंड)
619 विकेट्स- अनिल कुंबळे (भारत)
598 विकेट्स- स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड)
563 विकेट्स- ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया)
519 विकेट्स- कर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज)
496 विकेट्स- नेथन लायन (ऑस्ट्रेलिया)
474 विकेट्स- आर अश्विन (भारत)*
कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज
619 विकेट्स- अनिल कुंबळे
474 विकेट्स- आर अश्विन*
434 विकेट्स- कपिल देव
417 विकेट्स- हरभजन सिंग
311 विकेट्स- ईशांत शर्मा/झहीर खान
महत्वाच्या बातम्या-
कधी आणि कुठे पाहायचा IND vs WI पहिला कसोटी सामना? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व माहिती
आख्खं जग म्हणतंय ‘भारत विश्वचषकाचा प्रबळ दावेदार’, पण वर्ल्ड चॅम्पियन युवराजला नाही गॅरेंटी; म्हणाला…