---Advertisement---

द. अफ्रिकेच्या खेळाडूंकडून खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन; अशा दिल्या रोहित-मयंकला शुभेच्छा

On: गुरूवार, ऑक्टोबर 3, 2019 8:23 PM
---Advertisement---

विशाखापट्टणम। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात बुधवारपासून(2 ऑक्टोबर) सुरु झालेल्या सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 502 धावांवर घोषित केला आहे. या डावात भारताकडून पहिल्या डावात सलामीवीर रोहित शर्माने दीडशतकी तर मयंक अगरवालने द्विशतकी खेळी केली आहे.

रोहितने पहिल्या डावात 244 चेंडूत 176 धावांची खेळी केली आहे. यामध्ये त्याने 23 चौकार आणि 6 षटकार मारले आहेत. तसेच मयंकने 371 चेंडूत 215 धावांची द्विशतकी खेळी केली आहे. त्यानेही या खेळीत 23 चौकार आणि 6 षटकार मारले आहे. या दोघांनी मिळून 317 धावांची सलामी भागीदारीही रचली आहे.

त्यामुळे त्यांच्या या शानदार खेळीनंतर ते बाद झाल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी रोहित आणि मयंक या दोघांबरोबरही हात मिळवत शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यामुळे सध्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे कौतुक होत आहे.

बीसीसीआयनेही इंस्टाग्रामवर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी मयंक आणि रोहितच्या खेळींबद्दल शुभेच्छा दिलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोला बीसीसीआयने ‘खिलाडूवृत्ती’ असे कॅप्शन दिले आहे.

https://www.instagram.com/p/B3JpCj4Axdc/

या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या पहिल्या डावात 20 षटकात 3 बाद 39 धावा केल्या आहेत. त्यांच्याकडून डिन एल्गार 27 धावांवर तर तेंबा बाऊमा 2 धावांवर नाबाद आहेत. भारताकडून या डावात दुसऱ्या दिवसाखेर आर अश्विनने 2 आणि रविंद्र जडेजाने 1 विकेट घेतली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment