---Advertisement---

सलग पराभवांनंतर टीम इंडियाचा कोचिंग स्टाफ दोन गटांत विभागला! जाणून घ्या नेमकं कारण

On: शनिवार, जुलै 11, 2026 10:12 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ (Indian cricket team) सलग 6 सामन्यांत पराभूत झाल्यामुळे सध्या प्रचंड दबावाखाली आहे. आयर्लंडविरुद्धच्या दारुण पराभवानंतर टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतही अपयश आले आहे. या खराब कामगिरीनंतर आता कोचिंग स्टाफमध्ये बदल करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, इंग्लंडमध्ये टीम इंडियाचा कोचिंग स्टाफ दोन गटांत विभागला गेल्याचे दिसून येत आहे, ज्याचे कारण जाणून घेण्यासाठी भारतीय चाहते उत्सुक आहेत.

टी-20 मालिकेनंतर आता टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. सध्या साउथहॅम्प्टनमध्ये शेवटचा टी-20 सामना सुरू आहे, तर 14 जुलैपासून एजबॅस्टन येथे वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी शुबमन गिलच्या (Shubman gill) नेतृत्वाखाली वनडे संघ इंग्लंडला पोहोचला आहे. याच कारणामुळे कोचिंग स्टाफची विभागणी झाली आहे; एक गट टी-20 संघासोबत आहे, तर दुसरा गट वनडे संघाच्या तयारीसाठी मेहनत घेत आहे.

वनडे मालिकेवर सर्वांचे लक्ष आहे, कारण यामध्ये विराट कोहली (Virat Kohli and Rohit Sharma) आणि रोहित शर्मा हे दोन्ही दिग्गज खेळाडू संघात सामील झाले आहेत. तसेच कुलदीप यादवही (Kuldeep Yadav) संघात परतला आहे. टी-20 मालिका गमावल्यानंतर आता भारतीय संघ वनडे मालिका जिंकून जोरदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे.

वनडे मालिकेचे वेळापत्रक!
पहिला वनडे: 14 जुलै, एजबॅस्टन
दुसरा वनडे: 16 जुलै, कार्डिफ
तिसरा वनडे: 19 जुलै, लॉर्ड्स

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ: शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, गुरनूर बरार.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---