२०१९ ला इंग्लंड येथे होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसीने नुकतेच जाहीर केले आहे.
या विश्वचषकात सलामीचा सामना यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे.
तर १६ जून २०१९ ला विश्वचषकात भारताचा सामना पारंपारीक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.
३० मे ते १४ जुलै या दरम्यान होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात जगभरातील १० संघ सहभागी होणार आहेत.
आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचे इंग्लंडमध्ये पाचव्यांदा आयोजन होत आहे.
यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडने आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन केले होते.
२०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकाचे सर्व सामने इंग्लंडमधील ११ शहरांमध्ये होणार आहेत.
यामध्ये ओव्लह, एजबेस्टन, ट्रेंट ब्रिज, टॉन्टन, कार्डिफ, चेस्टर ली स्ट्रीट, हेडिंग्ले, ओल्ड ट्रॅफोर्ड, ब्रिस्टल, साउथहॅम्टन आणि लंडन या शहरांचा समावेश आहे.
या स्पर्धेतील केवळ सात सामने दिवस-रात्र असतील. उर्वरीत सर्व सामने दिवसा होतील.
आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना १४ जुलैला लंडनच्या ऐतिहासीक लॉर्ड्स मैदानावर होणार आहे.
यावेळी आयसीसीने १५ जुलैचा दिवच राखीव ठेवला आहे. कोणत्याही अडचणीमुळे अंतिम सामना होऊ शकला नाही, तर तो सामना १५ जुलैला होईल.
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०१९ भारताचे सामने-
०५ जून- दक्षिण अाफ्रिका (साउथहॅम्टन)
०९ जून- ऑस्ट्रेलिया ( ओव्लह )
१३ जून- न्यूझीलंड ( नॉटिंगहॅम )
१६ जून- पाकिस्तान (मॅंचेस्टर)
२२ जून- अफगानिस्तान (साउथहॅम्टन)
२७ जून- विंडीज (मॅंचेस्टर)
३० जून- इंग्लंड ( बर्मिंगहॅम)
०२ जुलै- बांगलादेश ( बर्मिंगहॅम)
०६ जुलै- श्रीलंका (लीड्स)
उपांत्य फेरीचे सामने आणि अंतिम सामना
०९ जुलै- पहिला सामना (मॅंचेस्टर)
११ जुलै- दूसरा सामना ( बर्मिंगहॅम)
१४ जुलै- अंतिम सामना (लॉर्ड्स)
महत्त्वाच्या बातम्या-
-इंग्लंड करणार कसोटीत खास विक्रम, भारताला पुढील ४० वर्षांतही मोडता येणार नाही हा पराक्रम
-रोनाल्डोचा फिटनेस वीस वर्षाच्या तरूण फुटबॉलपटूसारखा