---Advertisement---

स्पोर्ट्स अकॅडमी बारामती यांच्याकडून गरजू ना अन्नधान्याची मदत

On: मंगळवार, एप्रिल 7, 2020 12:13 PM
---Advertisement---

कोरोना व्हायरसने जगात थैमान घातले आहे. त्यामुळे भारतातही २५ मार्च २०२० पासून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पण लॉकडाऊनमुळे गरीब जनतेला मोठा प्रश्न पडला आहे. रोज कमावून खाणाऱ्या या लोकांना कोणताही रोजगार नसल्याने जेवणही मिळत नाही. अशाच गरीब लोकांसाठी अनेक संस्था व मंडळ पुढाकार घेऊन त्यांना अन्नधान्य पुरवत आहे.

बारामती येथील स्पोर्ट्स अकॅडमी बारामती यांचेकडून करूना च्या संकटात सापडलेल्या गरीब व गरजू लोकांसाठी छोटीशी मदत म्हणून किराणा भरून देण्यात आला तो किराणा बारामती आपत्कालीन समिती यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. प्रो कबड्डी व राष्ट्रीय कबड्डीपटू दादासो आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली स्पोर्ट्स अकॅडमी बारामती यांनी ही मदत केली आहे.

दादासो आव्हाड हे महाराष्ट्रातील आघाडीचे कबड्डीपटू आहेत. प्रो कबड्डी दबंग दिल्लीचे तसेस राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. स्पोर्ट्स अकॅडमी बारामती च्या माध्यमातून ते नवीन खेळाडु घडवत आहेत. लॉकडाउनमूळे त्यांनी गरिबांसाठी आपत्कालीन व्यवस्थापन समिती बारामती यांच्याकडे किराणा सुपूर्द केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---