---Advertisement---

क्रिस्टियानो रोनाल्डोने दिली तब्बल १६ लाखांची टिप

On: शुक्रवार, जुलै 20, 2018 2:52 PM
---Advertisement---

रशियातील 2018 च्या फिफा विश्वचषकातून दिग्गज क्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तूगाल संघ उपांत्य पूर्व फेरीतूनच बाहेर पडला.

या निराशाजनक पराभवानंतर क्रिस्टियानो रोनाल्डोने पर्यटनासाठी आपल्या कुटूंबासोबत ग्रीसला गेला होता.

ग्रीसमध्ये रोनाल्डो आपली प्रेयसी आणि मुलासोबत कोस्टा नवीरोनो या हॉटेलमध्ये राहिला होता.

क्रिस्टियानो रोनाल्डोने या कोस्टा नवीरोनो हॉटेलच्या स्टाफला आपली सुट्टी संपवून परतताना तब्बल 16 लाख रुपयांची टिप दिली आहे.

https://www.instagram.com/p/BlBucrjlXdV/?taken-by=cristiano

क्रिस्टियानो रोनाल्डोने कोस्टा नवीरोनो हॉटेलच्या स्टाफने दिलेल्या सेवेबद्दल, त्यांच्यावर खुष होउन हा निर्णय घेताला.

हॉटेलमधून जाताना रोनाल्डोने 16 लाखाचा चेक दिला. तसेच हॉटेलमधील कामगारांमध्ये हे 16 लाख रुपये समान हिस्स्यात वाटण्याची सूचना केली.

दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डोने रियल मॅद्रिद बरोबरचा २००९ पासूनचा आपला प्रवास नुकताच थांबवला आहे.

त्यानंतर रोनाल्डोने इटलीच्या जुवेंटस फुटबॉल क्लबशी चार वर्षांसाठी ८४६ कोटी रुपयांचा करार केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-कुलदीप यादव अंतिम 11मध्ये हवाच, इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूचे मत

-रशिद खान म्हणतो, कृणाल आपणही हे करायला हवे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment