---Advertisement---

आशियाई सुवर्णपदक विजेते बॉक्सर डिंको सिंग काळाच्या पडद्याआड, कँन्सरमुळे झाले निधन

On: गुरूवार, जून 10, 2021 12:12 PM
---Advertisement---

बॉक्सिंग विश्वात एक दु:खद घटना घडली आहे. आशियाई खेळातील सुवर्णपदक विजेते माजी बॉक्सर नगंगोम डिंको सिंग यांचा ४२व्या वर्षी दीर्घ आजाराने मृत्यू झाला आहे. गेले कित्येक वर्षे ते या आजाराशी झुंज देत होते. शेवटी गुरुवारी (१० जून) अल्पशा आजाराने त्यांचा मृत्यू झाला आहे. डिंको सिंग यांना यकृताचा कर्करोग झाला होता आणि कित्येक वर्ष ते या आजाराशी लढत होते.

गतवर्षी डिंको सिंग कोरोना संक्रमित सुद्धा झाले होते. परंतु, त्या आजारावर मात करत डिंको सिंग बरे झाले होते. डिंको सिंग यांचावर दिल्लीच्या आईएलबीएस रुग्णालयात उपचार चालू होते.

मागील वर्षी त्यांची तब्येत अचानक जास्तच खराब झाली होती. त्यामुळे त्यांना मणिपूरवरून दिल्लीला हलविण्यात आले होते. दरम्यान, डिंको सिंग यांच्यावर उपचार केले गेले. पण याचा त्यांचावर काहीच परिणाम झाला नव्हता. कारण, त्यांना कावीळ झाला होता. त्यानंतर या बॉक्सरला २४०० किलोमीटर लांब प्रवास करून दिल्लीवरून पुन्हा मणिपूर येथे आणले गेले होते.

डिंको सिंग यांच्या निधनावर खेळ मंत्री किरेन रीजीजू यांनी दु:ख व्यक्त केले आहे. किरेन रीजीजू यांनी ट्वीट केले की, ‘डिंको सिंग यांच्या निधनाने मला खूपच दु:ख झाले आहे. ते भारतातील आजवरचे सर्वोत्तम बॉक्सर राहिले आहेत. १९९८च्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून त्यांनी ‘बॉक्सिंग चेन रिएक्शन’ला जन्म दिला होता.’

त्यांची कारकिर्द पाहिल्यास डिंको सिंग यांनी बँकॉक येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यांचा कामगिरीमुळे त्यांना १९९८ रोजी ‘अर्जुन पुरस्कार’ आणि २०१३ ला ‘पद्मश्री पुरस्कार’ सुद्धा मिळाला होता. सहा वेळा विजयी झालेली ‘एम सी मेरीकॉम’ आणि ‘एल सरिता देवी’ यांचे प्रेरणास्थान राहिलेले डिंको सिंग भारतीय नौदलात कार्यरत होते आणि तिकडे ते बॉक्सिंग प्रशिक्षणाचेही काम करायचे. परंतु, पुढे कर्करोगाच्या आजारामुळे त्यांना घरीच बसावे लागले.

महत्त्वाच्या बातम्या-

मॉर्गन-बटलर कारकिर्दीतील सर्वात मोठं संकट उभं, ‘या’ कारणामुळे होऊ शकते कारवाई

भारीच! वार्षिक पगाराव्यतिरिक्त शतक, द्विशतक अन् बळींच्या पंचकाचाही भारतीय खेळाडूंना मिळतो ‘वेगळा पैसा’

आनंदी आनंद गडे! सामना विजयानंतर केन्या महिलांचे लक्षवेधी सेलिब्रेशन, केला जबराट डान्स

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---