---Advertisement---

शानदार सोहळ्यात झाले क्रीडा पुरस्कारांचे वितरण; नीरज, मितालीसह ६२ खेळाडूंना केले गेले सन्मानित

On: शनिवार, नोव्हेंबर 13, 2021 8:19 PM
---Advertisement---

भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार यासह अर्जुन पुरस्कार व द्रोणाचार्य पुरस्कार या सन्मानांचे शनिवारी (१३ नोव्हेंबर) राष्ट्रपती भवन येथील सेंट्रल हॉलमध्ये वितरण झाले. यावेळी १२ खेळाडूंना खेलरत्न, ३५ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, १० प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार व क्रीडा क्षेत्रात अमूल्य कामगिरी करणाऱ्या पाच जणांना ध्यानचंद पुरस्काराने गौरविण्यात आले. शनिवारी दुपारी हा कार्यक्रम पार पडला.

पुरस्कार विजत्यांची यादी – 

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार – नीरज चोप्रा (ऍथलेटिक्स), रवी कुमार (कुस्ती), लोव्हलिना बोरगोहेन (बॉक्सिंग), पीआर श्रीजेश (हॉकी), अवनी लेखरा (पॅरा नेमबाजी), सुमित अंतिल (पॅरा ऍथलेटिक्स), प्रमोद भगत (पॅरा बॅडमिंटन), कृष्णा नागर (पॅरा बॅडमिंटन) मनीष नरवाल (पॅरा नेमबाजी), मिताली राज (क्रिकेट), सुनील छेत्री (फुटबॉल), मनप्रीत सिंग (हॉकी).

अर्जून पुरस्कार – अरपिंदर सिंग (ऍथलेटिक्स), सिमरनजीत कौर (बॉक्सिंग), शिखर धवन (क्रिकेट), सीए भवानी देवी (तलवारबाजी), मोनिका (हॉकी), वंदना कटारिया (हॉकी), संदीप नरवाल (कबड्डी), हिमानी उत्तम परब (मल्लखांब), अभिषेक वर्मा (नेमबाजी), अंकिता रैना (टेनिस), दीपक पुनिया (कुस्ती), दिलप्रीत सिंग (हॉकी), हरमनप्रीत सिंग (हॉकी), रुपिंदर पाल सिंग (हॉकी), सुरेंद्र कुमार (हॉकी),अमित रोहिदास (हॉकी), विरेंद्र लाक्रा. (हॉकी), सुमित (हॉकी), नीलकांत शर्मा (हॉकी), हार्दिक सिंग (हॉकी), विवेक सागर प्रसाद (हॉकी), गुरजंत सिंग (हॉकी), मनदीप सिंग (हॉकी), शमशेर सिंग (हॉकी), ललित कुमार उपाध्याय (हॉकी), वरुण कुमार (हॉकी), सिमरनजीत सिंग (हॉकी), योगेश कथुनिया (पॅरा ऍथलेटिक्स), निषाद कुमार (पॅरा ऍथलेटिक्स), प्रवीण कुमार (पॅरा ऍथलेटिक्स), सुहाश यथिराज (पॅरा बॅडमिंटन), सिंहराज अधना (पॅरा नेमबाजी), भाविना पटेल (पॅरा टेबल टेनिस), हरविंदर सिंग (पॅरा तिरंदाजी) आणि शरद कुमार (पॅरा ऍथलेटिक्स).

द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव) – टी. पी. ओसेफ (ऍथलेटिक्स), सरकार तलवार (क्रिकेट), सरपाल सिंग (हॉकी), आशा कुमार (कबड्डी) तपन कुमार पाणिग्रही (जलतरण)

द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित) – राधाकृष्णन नायर पी (ऍथलेटिक्स), संध्या गुरुंग (बॉक्सिंग), प्रीतम सिवाच (हॉकी), जय प्रकाश नौटियाल (पॅरा नेमबाजी), सुब्रमण्यम रमण (टेबल टेनिस)

जीनवगौरव पुरस्कार – लेख के.सी. (बॉक्सिंग), अभिजित कुंटे (बुद्धिबळ), दविंदर सिंग गर्चा (हॉकी), विकास कुमार (कबड्डी), सज्जन सिंग (कुस्ती).

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---