---Advertisement---

श्रेयस अय्यरला धोनीकडून कानमंत्र

On: रविवार, जुलै 29, 2018 9:28 AM
---Advertisement---

भारतीय अ संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरला, टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने प्रसार माध्यमांपासून दूर राहण्याच्या मोलाचा सल्ला दिला होता.

याचा खुलासा खुद्द श्रेयस अय्यरने एका कार्यक्रमात बोलताना केला.

“भारतीय संघात जेव्हा माझा प्रथम समावेश झाला, तेव्हा धोनीने मला वृत्तपत्र आणि सोशल मिडियापासून शक्य तितके दूर राहण्याचा सल्ला दिला होता.” असे श्रेयस अय्यर म्हणाला.”

“आज सोशल मिडिया आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. मी त्यापासून शक्य तितके दूर राहण्याचा प्रयत्न करतोय, मात्र मला टीकाकारांनी केलेल्या टीकेमुळेच चांगली कामगिरी करण्याचे  बळ मिळते.” असे श्रेयस म्हणाला.

याबरोबरच २०१५ च्या आयपीएल लिलावानंतर त्याच्या आयुष्यात घडलेली  महत्त्वाची गोष्टही श्रेयसने या कार्यक्रमात उघड केली.

“२०१५ च्या आयपीएल लिलावात मला दिल्ली डेअरडेव्हिल्सने  करारबद्ध केले. त्यावेळी त्याची बातमी बाहेर येताच माझ्या ओळखीची एक मुलगी मला सातत्याने मॅसेजेस आणि कॉल करु लागली. पहिल्यांदा मला वाटले की ती मला आयपीएल खेळायला मिळणार त्यामुळे आनंदी आहे. मात्र नंतर मला कळाले की ती माझ्यासाठी नव्हे तर माझ्या पैशांसाठी आनंदी आहे.” पुढे हा किस्सा श्रेयस अय्यरने सांगितला.

श्रेयस अय्यरने गेल्या तीन वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.

त्याच्या या कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय अ आणि  दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे कर्णधार पद पटकावले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

-मार्टिन गप्टीलने केला टी२० मधील मोठा कारनामा

-माजी दिग्गज प्रशिक्षक म्हणतो, ब्रॉड-अँडरसन जोडी वाजवणार टीम इंडियाचा बॅंड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment