जर्मनीच्या मेसट ओझीलने सोमवारी (23 जुलै) आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेत, जर्मनी फुटबॉल महासंघाने त्याचा वंशभेदी टिकेपासून बचाव केला नाही असा आरोप केला होता.
जर्मनी फुटबॉल महासंघाने मेसट ओझीलचे हे आरोप फेटाळत या प्रकरणाबद्दल आपले मत व्यक्त केले आहेे.
“मेसट ओझीलने याप्रकारे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली याचे आम्हाला दुख: आहे. मात्र ओझीलने जर्मनी फुटबॉल महासंघावर केलेल्या आरोपांचे आम्ही समर्थन करत नाही. तसेच आम्ही ओझीलचा वंशभेदाच्या टीकेपासून बचाव केली नाही, असे ओझीलचे म्हणने चुकीचे आहे.” जर्मनी फुटबॉल महासंघाने मेसट ओझीलच्या आरोपांना या शब्दात उत्तर दिले.
फिफा विश्वचषकाच्या माजी विजेत्या जर्मनीच्या २९ वर्षीय मेसट ओझीलने आंतरराष्ट्रीय फुटबॉमधून तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली होती.
जर्मनी फुटबॉल महासंघातील काही सदस्य आणि चाहत्यांकडून सातत्याने होणाऱ्या वंशभेदाच्या टिकेमुळे मेसट ओझीलने हा टोकाचा निर्णय घेतला होता.
मुळचा तुर्कीचा असलेल्या मेसट ओझीलने, तुर्कीचे राष्ट्रपती रजब तैयब एर्दोगन यांच्यासोबत काढलेल्या फोटोमुळे ओझीलवर सातत्याने वंशभेदी टिका होत होती.
महत्त्वाच्या बातम्या-
-रोहीत शर्माच्या पत्नीचे युजवेंद्र चहलला सडेतोड उत्तर
-भारतीय क्रिकेट इतिहासात असे दुसऱ्यांदा घडले