---Advertisement---

फिफा विश्वचषक २०१८: अंतिम सामन्यातील कृत्य रशियन तरुणीला पडले महागात

---Advertisement---

मॉस्को | रविवारी (१५ जुलै) फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना सुरु असताना व्हेरोनिका निकोलशिना आणि इतर तीन व्यक्तींनी पोलिसांचा बोगस युनिफॉर्म परिधान करुन मैदानावर प्रवेश करत सामन्यात व्यत्यय आणला होता.

मॉस्को न्यायालयाने सोमवरी (१६ जुलै) व्हेरोनिका निकोलशिना नामक रशियन तरुणीला १५  दिवसांच्या कारवासाची शिक्षा सुनावली.

व्हेरोनिका निकोलशिना सोबतच्या बाकीच्या तीन व्यक्तींच्या शिक्षेचा निकाल मॉस्को न्यायालयाने राखून ठेवला आहे.

त्याचबरोबर व्हेरोनिका निकोलशिनाला पुढील तीन वर्ष रशियातील कोणत्याही क्रीडा स्पर्धेचा सामना मैदानावर जाउन पाहता येणार नाही.

“या लोकांना मैदानात पाहून माझे स्वत:वरील संतुलन सुटेले होते. यांना मैदानातून बाहेर फेकून द्यावे असे मला वाटत होते. या लोकांनी मैदानात प्रवेश केल्याने आमच्या खेळातील लय बिघडली.” असे क्रोएशियाचा बचावपटू डिजेन लोवेरेन यावर प्रतिक्रिया देताना म्हणाला. म्हणाला.

फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बलाढ्य फ्रान्सने क्रोएशियाला ४-२ ने पराभूत करत १९९८ नंतर दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला.

१४ जूनला रशियात सुरु झालेल्या २०१८ च्या २१ वा फिफा विश्वचषकाचा अनेक नाट्यमय घटनांनी १५ जुलैला समारोप झाला.

महत्त्वाच्या बातम्या-

या कृतीने क्रोएशियन राष्ट्राध्यक्षांनी जिंकली करोडो फुटबॉल रसिकांची मने

१९ वर्षीय किलियन एम्बापेचे कौतुकास्पद पाऊल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment