अनुभवी क्रिडा पत्रकार जीके मेनन यांचे काल (११ ऑगस्ट) सकाळी मुंबई उपनगरमध्ये निधन झाले आहे. मेनन ९३ वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि मुलगी आहेत. त्यांनी इंडियन एक्सप्रेस आणि द टाइम्स ऑफ इंडिया अशा वृत्तपत्रांमध्ये काम केले होते. त्यानंतर १९९० दशकाच्या सुरुवातीला त्यांनी फ्रिलांसर म्हणून त्यांच्या कारकिर्दीचा शेवट केला होता. Veteran Sports Journalist GK Menon Died Yesterday
मेनन (GK Menon) यांनी क्लब स्तरावर क्रिकेट खेळले होते. ते दादरमध्ये असलेल्या शिवाजी पार्क जिमखानाचे सक्रिय सदस्य होते. तसेच, १९५२-५३ ला मेनन बॉम्बे यूनिव्हर्सिटी संघाचे व्यवस्थापक होते. त्यांच्या संघाने बेंगलोरमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात दिल्ली संघाला पराभूत करत रोहिंग्टन बारिया ट्रॉफी जिंकली होती.
त्यावेळी बॉम्बे यूनिव्हर्सिटी संघात चंदू पाटनकर, नारी कॉन्ट्रैक्टर, रामनाथ केनी, नरेन तम्हाणे आणि जीआर सुंदरम असे क्रिकेटपटू होते. हे क्रिकेटपटू भविष्यात भारतीय कसोटी संघाकडून खेळले. शिवाय, माजी भारतीय वेगवान गोलंदाज स्वर्गीय रमाकांत देसाई यांची कारकिर्द घडवण्यासाठी मेनन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
पहिल्यांदाच भारतीय क्रिकेटर सापडली नाडाच्या जाळ्यात, होऊ शकते ४ वर्षांसाठी बंदी
कुटुंबातील सदस्याच्या निधनामुळे हुकले इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूचे कसोटी पदार्पण
शतक ठोकल्यावर जीभ काढणारा खेळाडू म्हणतोय, ‘२०२१ मधील टी२० विश्वचषकात खेळेल की नाही माहित नाही’
ट्रेंडिंग लेख –
४ दिग्गज कर्णधार ज्यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला
ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये १२ चेंडूत अर्धशतक झळकावणारे ३ महारथी
कसोटी क्रिकेटमधील सर्वात धीमी खेळी करणारे ५ फलंदाज; एबी डिव्हिलियर्सचाही आहे समावेश