भारत आणि श्रीलंका यांच्यात शुक्रवारपासून (४ मार्च) पंजाबमधील मोहाली येथील क्रिकेट स्टेडियमवर कसोटी सामना सुरु होतोय. भारतीय संघासाठी ऐतिहासिक असणाऱ्या या कसोटी सामन्यापूर्वी संघाचा नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) याची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत रोहितने अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. परंतु, रोहित शर्माची पत्रकार परिषद (Rohit Sharma Press Conference) गाजवली ती एका मराठी पत्रकाराने. नेमकं काय घडलं पत्रकार परिषदेत, चला जाणून घेऊयात…
‘मोहाली कसोटी’ (Mohali Test) भारतीय संघासाठी अनेकांगांनी महत्वाची आणि ऐतिहासिक ठरणार आहे. त्यातही विराट कोहलीची शंभरावी कसोटी (Virat Kohli 100th Test) हा या सामन्याचा प्रमुख भाग. या सर्व पार्श्वभूमीवर कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) याची सामन्याच्या आदल्यादिवशी म्हणजेच गुरुवारी (३ मार्च) पत्रकार परिषद झाली.
रोहितला पत्रकारांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये एकापाठोपाठ एक प्रश्न विचारले, जे की बहुतेक विराट कोहली आणि संबंधित मुद्द्यांशी निगडीत होते. रोहितनेही त्यावर दिलखुलास उत्तरे दिली. मात्र, त्याचवेळी मराठीतील प्रसिद्ध क्रीडा पत्रकार ‘सुनंदन लेले’ (Sports Journalist Sunandan Lele) यांनी कर्णधार रोहितला एक दर्जेदार प्रश्न विचारला. जो प्रश्न उपस्थित सर्व पत्रकारांना जागे करणारा होता. त्यांचा तो प्रश्न ऐकून रोहित शर्माही जाम खुश झाला आणि त्याच्या तोंडून अपोआपच ‘याला म्हणतात प्रश्न’ असे उद्गार बाहेर पडले.
रोहितला खुश करणारा आणि सर्व पत्रकारांना भानावर आणणारा तो प्रश्न काय होता?
भारत आणि श्रीलंका (India Vs Sri Lanka) यांच्यात मोहाली येथे कसोटी सामना होतोय. जरी हा सामना विराटसाठी खास असला तरीही सदर सामना दोन्ही संघांसाठी तितकाच महत्वाचा असणार आहे. तसेच, रोहितचा कसोटी संघाचा कर्णधार म्हणूनही हा पहिलाच सामना असणार आहे. त्यामुळे पत्रकारांनी दोन्ही संघ, संघातील खेळाडू, संघाची व्युहरचना अथवा धोरण, सामना ज्यावर होतोय ते मैदान, पीच (मैदानावर फलंदाजी करण्याची खेळपट्टी) आदी विषयांवर प्रश्न विचारणे आवश्यक होते. मात्र, सुरुवातीपासून सर्वच पत्रकार यातील कोणत्याही मुद्द्यांवर उत्सुक असल्याचे दिसून आले नाही.
अशातच पत्रकार सुनंदन लेले यांनी रोहित शर्माला, ‘रोहित सामना आऊटफिल्डवर तर होत नाहीये ना? कारण विकेट (ग्राऊंड-पीच) बाबत तू काहीच बोलत नाही. विकेट कशी आहे ते सांग’ असे म्हटले. त्यावर रोहितने देखील, ‘कोणी विचारतच नाहीये. मी तरी काय उत्तर देऊ’ असं म्हटलं. त्यानंतर सुनंदन लेले यांनी ‘म्हणूनच मी विचारतोय. विकेटबद्दल बोलूयात. आणि क्राऊड (प्रेक्षक) परत येतायेत. तर त्यामुळे उर्जा परत मिळते का. तुला असं वाटतं का?’ असा प्रश्न रोहित शर्माला विचारला. (Sports journalist Sunandan Lele Asked Question About Mohali Test)
https://twitter.com/mipaltan/status/1499325596421156865?s=20&t=Kv6-TF_s7JRHDsduKAu8XQ
पत्रकार सुनंदन लेले यांच्या प्रश्नावर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश झाला आणि लेले यांच्या प्रश्नाचे कौतुक करताना, ‘अगदी बरोबर. योग्य प्रश्न तर कोणी विचारतच नाही. हा खरा प्रश्न आहे. आणि असंच विचारायला हवं, प्रेक्षक येणार की नाही? संघाची रचना काय असेल? पण असं कोणी विचारतच नाही. मलाही मग चांगलंच आहे’ असे उद्गार रोहितने काढले.
(Marathi Sports journalist Asked Question About Mohali Test To Captain Rohit Sharma Get Happy In Press Conference)
अधिक वाचा :
IPL 2022: ‘या’ तारखेपासून संघ सुरू करू शकतात सराव, महाराष्ट्र सरकारची ५ जागांसाठी मंजूरी
‘विराट महान खेळाडू आहे आणि तो…’, बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीकडून कोहलीच्या पाठीवर कौतुकाची थाप