क्रिकेटपटू आणि बॉलिवूडचे नाते गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. अशातच आणखी एका अभिनेत्रीचे भारतीय क्रिकेटपटूसाठी असलेले आपले प्रेम समोर आले.
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या चाहत्यांची संख्या जगभरात कमी नाही. त्यामध्ये आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीची भर पडली.
ज्या बॉलिवूड अभिनेत्री विषयी आपण बोलतोय तिचे नाव आहे कियारा अडवाणी. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या लस्ट स्टोरीज या वेब सिरीजमुळे चर्चेत असलेल्या कियाराने एमएस धोनी सोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
एका कार्यक्रमात कियाराला कोणत्या भारतीय क्रिकेटपटूसोबत डेटवर जायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी एका क्षणाचाही विलंब न लावत कियाराने एमएस धोनीचे नाव घेतले होते.
” मला माहीबद्दल आता खूप काही माहित आहे. माही ज्या प्रकारे झिवाला संभाळतो ते कौतुकास्पद आहे. त्यााची पत्नी साक्षीसुद्धा छान व्यक्ती आहे. मला जेव्हा धोनीच्या परिवाराला भेटण्याची संधी मिळते त्यावेळी मला छान वाटते. माहीने इतके यश मिळवले आहे तरीही त्याचे पाय मात्र जमिनीवरच आहेत.” या शब्दात कियारा अडवानीने धोनीविषयीचे आपले प्रेम व्यक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या-
-भारताला वनडे मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी
-फिफा विश्वचषक: तिसऱ्या स्थानासाठी बेल्जियम – इंग्लंड आज लढणार