रिलायन्स फाउंडेशन डेव्हलपमेंट लीगचा (आरएफडीएल) पहिलावहिला हंगाम शुक्रवारपासून (१५ एप्रिल) सुरू होत आहे. या लीगमध्ये केवळ आरएफडीएल नव्हे, तर हीरो इंडियन सुपर लीगमधील क्लबचे 7 संघ सहभागी होणार आहे. त्यामुळे देशातील या पहिल्या युथ क्लब स्पर्धेची मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.
रिलायन्स फाउंडेशन डेव्हलपमेंट लीगमध्ये रिलायन्स फाउंडेशन यंग चँप्ससह (आरएफवायसी) आयएसएलमधील सात क्लब आमनेसामने आहेत. आठ संघांचा समावेश असलेल्या आरएफडीएलमध्ये सलामीच्या लढतीत नागोवा फुटबॉल मैदानावर चेन्नईयन एफसी संघ होम टीम एफसी गोवा संघाशी दोन हात करेल. आयोजक रिलायन्स फाउंडेशन यंग चँप्सचा पहिला सामना बंगळूरु एफसीशी बेनॉलिम येथे होईल.
भारताचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अराता इझुमी हे आता रिलायन्स फाउंडेशन यंग चँप्स (आरएफवायसी) टीमचे मुख्य प्रशिक्षक आहेत. आरएफवायसी ही भारतातील फाइव्ह स्टार रेटेड फुटबॉल कॅडमी आहे. या ऍकॅडमीच्या माध्यमातून भारताचे फुटबॉलमधील भविष्य घडवण्याचा उद्देश आहे.
रिलायन्स फाउंडेशन डेव्हलपमेंट हा युवा आणि प्रतिभावंत फुटबॉलपटूंसाठी एक मोठे व्यासपीठ आहे. यात प्रत्येक संघ अन्य सात संघांशी दोन हात करेल. युथ डेव्हलपमेंट मिशनच्या दृष्टीने ही लीग महत्त्वपूर्ण आणि परिणामकार ठरणार आहे, असे आरएफवायसीचे मुख्फ प्रशिक्षक अराता इझुमी यांनी म्हटले आहे. आरएफवायसी ही आरएफडीएलमधील सर्वात युवा लीग आहे. १२ वर्षांच्या मुलांवर जवळपास पाच वर्षांहून अधिक मेहनत घेत रिलायन्स फाउंडेशन यंग चँप्स टीम निवडण्यात आली आहे.
रिलायन्स फाउंडेशन डेव्हलपमेंट लीग ही राउंड रॉबिन पद्धतीने खेळली जाणार आहे. त्यात प्रत्येक क्लबच्या संघाला प्रत्येकी सात सामने खेळायला मिळतील. यातील दोन अव्वल टीम ब्रिटनमध्ये (युके) होणाऱ्या नेक्स्ट जेन कप स्पर्धेत खेळतील. नेक्स्ट जेन कप स्पर्धा ही प्रीमियर लीगकडून आयोजित केली जाणार असून पुढील वर्षी खेळवली जाईल. नेक्स्ट जेन कप स्पर्धा प्रथमच भरवली जाणार आहे.
रिलायन्स फाउंडेशन डेव्हलपमेंट लीगमध्ये १ जानेवारी २००१किंवा त्यानंतर जन्मलेले खेळाडू भाग घेऊ शकतात. तसेच प्रत्येक क्लब २३ वर्षांखालील संघातील तीन खेळाडू (१ जानेवारी १९९९ नंतर जन्मलेले) अंतिम संघात (प्लेइंग इलेव्हन) खेळवू शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! दीपक चाहर आयपीएलसह टी२० वर्ल्डकपलाही मुकण्याची शक्यता, तब्येतीबाबत महत्वाची अपडेट