अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर मंगळवारी (२ नोव्हेंबर) रोमांचक सामना पार पडला. आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सुपर-१२ फेरीतील ३१ वा सामना पाकिस्तान विरुद्ध अफगानिस्तान या दोन्ही संघांमध्ये रंगला. या रोमांचक सामन्यात पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळत असलेल्या नामिबिया संघाने जोरदार लढत दिली. परंतु त्यांना या सामन्यात विजय मिळवता आला नाही. या सामन्यात पाकिस्तान संघाने ४५ धावांनी विजय मिळवला. दरम्यान या सामन्यातील पहिल्या डावात पाकिस्तान संघातील खेळाडूंनी असे काही केले जे पाहून कोट्यवधी क्रिकेटचाहत्यांना अभिमान वाटला असेल.
क्रिकेटला सभ्य लोकांचा खेळ असे म्हटले जाते. या खेळात गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये वैर पाहायला मिळत असते. परंतु गोष्ट जेव्हा मदत करण्याची येते तेव्हा खेळाडू आपापसातील मतभेद आणि वैर विसरून मदतीला धावत येत असतात. असाच काहीसा प्रकार पाकिस्तान विरुद्ध नामिबिया यांच्यात झालेल्या सामन्यात देखील पाहायला मिळाला.
तर झाले असे की, पाकिस्तान संघाची फलंदाजी सुरू असताना, ६ वे षटक टाकण्यासाठी फ्राइलिंक गोलंदाजीला आला होता. फ्राइलिंकचे हे वैयक्तिक पहिलेच षटक होते. या षटकातील दुसरा चेंडू टाकल्यानंतर फ्राइलिंकचा तोल गेला आणि फॉलो थ्रू मध्ये तो खेळपट्टीवर पडला. तो पडताच नॉन स्ट्राइकला फलंदाजी करत असलेला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम त्याच्याजवळ आला आणि त्याला विचारपूस करू लागला. त्यानंतर नामिबिया संघातील खेळाडू देखील त्याची विचारपूस करण्यासाठी फ्राइलिंक जवळ आले. बाबर आजमने केलेल्या या कृत्याचे सोशल मीडियावर भरपूर कौतुक केले जात आहे.
https://www.instagram.com/reel/CVxvAfml6un/?utm_medium=copy_link
पाकिस्तान संघाने हा सामना जिंकून आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पाकिस्तान संघाने या स्पर्धेत आतापर्यंत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभूत केले. त्यानंतर न्यूझीलंड, अफगानिस्तान आणि आता नामिबिया संघाला पराभूत करत सलग चौथा विजय मिळवला आहे. पाकिस्तान संघाचा सुपर -१२ फेरीतील शेवटचा सामना स्कॉटलॅंड संघासोबत होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सलग चौथ्या विजयासह पाकिस्तानने मिळवले उपांत्य फेरीचे तिकीट, दुसऱ्या स्थानासाठी ‘हे’ २ संघ शर्यतीत
पाकिस्तान ऑन टॉप! टी२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिकवेळा सेमीफायनल गाठण्यात आझमचा संघ अव्वल