भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने(बीसीसीआय) स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेला भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीशांतच्या बंदीचा कालावधी कमी केला आहे. आता त्याच्यावर केवळ 7 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयाने दिलासा मिळालेल्या श्रीसंतने पुन्हा एकदा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
श्रीसंतच्या निलंबनाचे 6 वर्षे आधीच पूर्ण झाले असल्याने आता 13 सप्टेंबर 2020 ला त्याच्या बंदीच्या 7 वर्षांचा कालावधी पूर्ण होणार असल्याचे बीसीसीआयचे लोकपाल डीके जैन यांनी सांगितले आहे.
श्रीसंतवर बीसीसीआयने 2013 च्या आयपीएलमध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे आजीवन बंदी घातली होती. पण आता त्याची ही बंदी 7 वर्षांचीच करण्यात आली आहे.
या निर्णयानंतर मीडियाशी बोलताना श्रीसंत म्हणाला, ‘मी आत्ता जे काही ऐकले आहे, ते ऐकून मी खूप खुश आहे. मी माझ्या शुभचिंतकांचे आभार मानतो, ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि या प्रार्थनेचे फळ मिळाले आहे.’
‘मी आत्ता 36 वर्षांचा आहे आणि पुढील वर्षी मी 37 वर्षांचा होईल. माझ्या कसोटीमध्ये आत्ता 87 विकेट्स आहेत आणि माझे ध्येय आहे की मला माझ्या कारकिर्दीत 100 कसोटी विकेट्स पूर्ण करायच्या आहेत. मला विश्वास आहे की मी भारतीय कसोटी संघात पुनरागमन करेल आणि माझी नेहमीच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळण्याची इच्छा होती.’
36 वर्षीय श्रीसंतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27 कसोटी, 53 वनडे आणि 10 टी20 सामने खेळले आहेत. तसेच त्याने कसोटीत 87 विकेट्स, वनडेत 75 विकेट्स आणि टी20मध्ये 7 विकेट्स घेतल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–नव्या कसोटी जर्सीत दिसली टीम इंडिया, पहा फोटो
–पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली या भारतीय मुलीबरोबर अडकला लग्नबंधनात
–…म्हणून ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या जर्सीच्या कॉलरवर आहे हे सोनेरी फुल, जाणून घ्या कारण