---Advertisement---

तब्बल आठ वर्षांनी श्रीसंत करणार आयपीएलमध्ये पुनरागमन, लिलावासाठी असेल ‘ही’ किंमत

On: शनिवार, फेब्रुवारी 6, 2021 12:15 AM
---Advertisement---

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे बिगुल वाजले आहेत. सर्व संघ आपले महत्त्वपूर्ण क्रिकेटपटू कायम राखून उर्वरित खेळाडूंसाठी होणाऱ्या लिलावाची वाट पाहत आहेत. १८ तारखेला हा लिलाव चेन्नई येथे पार पडेल. तत्पूर्वी, आज लिलावासाठी नोंदणी केलेल्या क्रिकेटपटूंची यादी जाहीर झाली. भारताचा विश्‍वविजेता वेगवान गोलंदाज श्रीसंत यानेदेखील या लिलावासाठी आपले नाव नोंदवले आहे.

श्रीसंतने नोंदवले लिलावासाठी नाव

भारतासाठी तिन्ही प्रकारची क्रिकेट खेळलेल्या अनुभवी श्रीसंतने तब्बल आठ वर्षानंतर आयपीएल मध्ये सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदविले. २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात नाव आल्याने त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. मात्र, नंतर त्याची शिक्षा कमी करून सात वर्ष इतकी करण्यात आली. १८ तारखेला होणाऱ्या लिलावावेळी त्याची बोली ७५ लाख रुपयांपासून सुरू होईल. ही त्याची आधारभूत किंमत आहे.

भारताचा प्रमुख गोलंदाज होता श्रीसंत

श्रीसंतने २००५ ते २०११ या कालावधीत भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. भारताने जिंकलेल्या २००७ टी२० विश्वचषक व २०११ वनडे विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचा तो सदस्य होता. श्रीसंतने आपल्या आयपीएल कारकिर्दीत ४४ सामने खेळताना ४० बळी मिळवले आहेत. त्याने आत्तापर्यंत किंग्स इलेव्हन पंजाब, कोची टस्कर्स केरला व राजस्थान रॉयल्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

१,०९७ क्रिकेटपटूंनी केली नावनोंदणी

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी जाहीर केलेल्या पत्रकानुसार आयपीएलच्या आगामी हंगामासाठी तब्बल १,०९७ खेळाडूंनी नावनोंदणी केली आहे. यामध्ये ८१४ भारतीय व २८३ विदेशी खेळाडूंची नावे आहेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क व इंग्लंडचा कर्णधार जो रूट या लिलावामध्ये भाग घेणार नाहीत. तर, भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन हा प्रथमच या लिलावात सहभागी असेल.

महत्वाच्या बातम्या:

आयपीएल 2021 साठीच्या लिलावात सहभागी होणार अर्जुन तेंडुलकर, इतकी असेल बेस प्राईस

मेरा नाम है वॉशिंग्टन, रिषभ पंतने भर मैदानात रचले नवीन गाणे, पाहा भन्नाट व्हिडिओ

व्हिडिओ : कर्णधाराचे शतक होताच ड्रेसिंग रूममध्ये आनंदाची लहर, इंग्लंडच्या खेळाडूंनी असे केले सेलिब्रेशन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---