भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज श्रीसंत हा क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करणार आहे. तो देशांतर्गत खेळल्या जाणार्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेला जानेवारी मध्ये सुरुवात होणार आहे. सात वर्षापूर्वी आयपीएल स्पर्धेत स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकल्यामुळे त्याच्यावर सात वर्षाची बंदी घालण्यात आली होती.
श्रीसंतची सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी केरळ संघाने आपल्या संघात निवड केली आहे. त्यामुळे या स्पर्धेत तो केरळ संघाचा सदस्य म्हणून सहभागी होणार आहे. त्याच्यावर घालण्यात आलेल्या बंदीचा कालावधी सप्टेंबर महिन्यात पूर्ण झाला होता. त्यामुळे तो स्पर्धात्मक क्रिकेट सामन्यात भाग घेवू शकणार आहे. केरळ संघाचा कर्णधार संजू सॅमसन आहे आणि उपकर्णधार सचिन बेबी असणार आहे.
श्रीसंतने त्याची केरळ संघात निवड झाल्यानंतर त्याला टोपी देतानाचा व्हिडिओ ट्विटर शेअर केला. ज्यामधे केरळ संघाचे अधिकारी त्याला टोपी देत आहे. इतर सर्व खेळाडू टाळ्या वाजवून स्वागत करत आहेत. तसेच या व्हिडिओला त्याने “खचून गेलेला माणूस जेव्हा स्वत:ला पुन्हा उभे करत असतो, तेव्हा त्यापेक्षा अधिक शक्तिशाली काहीही नसते”, असे कॅप्शनही दिले आहे.
https://twitter.com/sreesanth36/status/1344225183079534592?s=19
वयाच्या 37 व्या वर्षी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे अवघड
यापूर्वी श्रीसंतला शेवटचे खेळताना 2011 साली ऑगस्ट महिन्यात बघितले गेले होते. या व्यतिरिक्त त्याचे नाव 2013 साली प्रथम श्रेणी क्रिकेटच्या यादीत होते. वयाच्या 37 व्या वर्षी सूर गवसणे सोपी गोष्ट असणार नाही. परंतु मैदानावर टिकून राहण्यासाठी त्याला चांगल्या प्रकारे पुनरागमन करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील.
2023च्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न
आपल्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलतांना 37 वर्षीय श्रीसंतची म्हणणे आहे की, “त्याचे शेवटचे स्वप्न आहे की, तो 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत भारताकडून खेळावा, आणि पुन्हा एकदा विश्चवषक जिंकण्यात आपले योगदान देवून इतिहास रचावा.”
महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 2011 साली भारतीय संघाने विजेतेपद पटकावले होते, तेव्हा श्रीसंत भारतीय संघाचा भाग होता. मात्र स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकल्यामुळे त्याच्यावर सात वर्षाची बंदी घालण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या:
– डेविड वॉर्नरचे पुनरागमन! असा आहे भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ
– ब्रेकिंग: भीषण अपघातातून बालंबाल बचावले मोहम्मद अझरुद्दीन, गाडीचा झाला चक्काचूर
– अटीतटीच्या बॉक्सिंग डे कसोटीत न्यूझीलंडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय