वनडे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पहिल्या आठवड्यात अनेक रोमांचक सामने झालेले पाहायला मिळत आहेत. असे असले तरी जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर आहे. 14 ऑक्टोबर रोजी हा सामना अहमदाबाद येथे खेळला जाईल. या सामन्याबद्दल माजी क्रिकेटपटू आपली प्रतिक्रिया देत आहेत. भारताचा माजी वेगवान गोलंदाज श्रीसंत याने एक मोठे विधान केले आहे.
विश्वचषकातील सर्वात मोठा सामना मधून भारत आणि पाकिस्तान या सामन्याकडे पाहिले जातेय. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे हा सामना होईल. या सामन्यात सर्वांची नजर पुन्हा एकदा अनुभवी विराट कोहली याच्यावर असणार आहे. एका मुलाखतीत बोलताना श्रीसंत याने विराटबाबत एक मोठे वक्तव्य केले. तो म्हणाला,
“मला वाटते की विराट कोहली किंवा हार्दिक पंड्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील सामनावीर पुरस्कार जिंकतील. हार्दिक खराब सुरुवातीनंतर काही धावा करेल आणि अष्टपैलू कामगिरी करेल. विराट पाकिस्तानविरुद्ध 48 वे वनडे शतक झळकावणार आहे. पाकिस्तान गेल्या काही काळापासून चांगली कामगिरी करत आहे. मात्र, रोहित, विराट आणि केएल राहुल चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि जर शुबमन गिल परत आला तर ते सोपे होणार नाही. हार्दिक आणि जडेजाही संघात आहेत.”
विराट या विश्वचषकात चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघ अडचणीत असताना 85 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिलेला. तर, अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद 55 धावांची खेळी केली होती.
(Sreesanth Predict Virat Kohli Hits 48th ODI Century Against Pakistan)
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलिया vs दक्षिण आफ्रिका सामन्यात गोंधळ! मार्कस स्टॉयनिस आणि स्टीव स्मिथच्या विकेटमुळे वाद
IND vs PAK सामन्यापूर्वी होणार भव्य सोहळा, प्रसिद्ध बॉलीवूड गायक दाखवणार आपल्या आवाजाची जादू