आयपीएल 2021 चा नववा सामना रोहित शर्माची मुंबई इंडियन्स आणि डेविड वॉर्नरच्या सनरायजर्स हैदराबाद संघात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात आला. परंतु या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन याला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. आता यााबाबत सनरायझर्स हैदराबाद संघाचे डायरेक्टर टॉम मूडी यांनी वक्तव्य केले आहे.
या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने संघात चार बदल केले होते. यामध्ये नटराजन व्यतिरिक्त त्यांनी जेसन होल्डर, वृध्दिमान साहा आणि शाहबाज नदीम यांनाही संघाबाहेर ठेवले गेले होते.
यावर संघाचे डायरेक्टर टॉम मूडी म्हणाले की, “नटराजनला संघातून वगळण्यात आले नव्हते तर त्याला विश्रांती देण्यात आली होती. कारण आम्हाला माहित आहे की गेल्या सहा महिन्यांत त्याने बरेच क्रिकेट खेळले आहे आणि आयपीएलचा हंगामही खूप मोठा असल्याने आम्हाला त्याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे तो जर 100 टक्के तंदुरुस्त असेल तर आम्ही त्याला नक्की खेळवू.”
नटराजनच्या जागी या सामन्यात खलील अहमदला संघात स्थान देण्यात आले होते. तर त्याच्याशिवाय ऑफस्पिनर मुजीब उर रहमान, डावखुरा फिरकीपटू अभिषेक शर्मा आणि फलंदाज विराट सिंग यांनाही संघात सामील केले होते.
यासामन्याबद्दल सांगायचे झाले तर, मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉकच्या 40 धावा, कर्णधार रोहित शर्माच्या 32 धावा आणि अष्टपैलू कायरन पोलार्डच्या 35 धावांच्या जोरावर 20 षटकांत 5 गडी गमावून एकूण 150 धावा केल्या होत्या. तर हैदराबादकडून गोलंदाजीत मुजीब रहमान आणि विजय शंकरने प्रत्येकी 2-2 बळी मिळवले होते.
दुसर्या डावात हैदराबादकडून लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर जॉनी बेयरस्टोने 22 चेंडूत 43 धावांची विस्फोटक खेळी केली होती. तर याशिवाय कर्णधार वॉर्नरनेही 36 धावा केल्या होत्या. पण राहुल चाहर आणि ट्रेंटच्या शानदार गोलंदाजीसमोर हैदराबाद संघाने पूर्णपणे हार मानली. राहुल चहरने 4 षटकांत केवळ 19 धावा देऊन 3 गडी बाद केले. तर त्याचवेळी ट्रेंट बोल्टनेही 3..4 षटकांत 28 धावा देऊन 3 बळी घेत मुंबईला 13 धावांनी विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आमच्यासोबत हे काय घडतंय काहीच कळेना,’ सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार वॉर्नरने व्यक्त केली नाराजी
चाहर-बोल्टच्या भेदक माऱ्यापुढे ‘ऑरेंज आर्मी’ गारद; आयपीएलच्या मोठ्या विक्रमात मुंबईकर अव्वलस्थानी