भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज मनीष पांडेने आयपीएल २०२० मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने गुरुवारी (२२ ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबादकडून राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना मोठा कारनामा केला आहे. तो सर्वाधिक टी२० क्रिकेटचे सामने खेळणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे.
राजस्थानविरुद्ध मनीष २५० वा टी२० सामना खेळणारा अकरावा खेळाडू ठरला आहे. यासह त्याचा रोहित शर्मा, एमएस धोनी, सुरेश रैना, विराट कोहली यांसारख्या दिग्गजांच्या यादीत समावेश झाला आहे.
सर्वाधिक टी२० सामने खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर रोहित शर्मा आहे. त्याने आतापर्यंत ३३७ सामने खेळले आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर एमएस धोनी (३२७), तिसऱ्या क्रमांकावर सुरेश रैना (३१९), चौथ्या क्रमांकावर दिनेश कार्तिक (२९८) आणि पाचव्या क्रमांकावर विराट कोहली (२९१) आहे.
याव्यतिरिक्त सहाव्या क्रमांकावर युसूफ पठाण (२७४), सातव्या क्रमांकावर शिखर धवन (२६९), आठव्या क्रमांकावर हरभजन सिंग (२६५), नवव्या क्रमांकावर रॉबिन उथप्पा (२६४) आणि दहाव्या क्रमांकावर गौतम गंभीर (२५१) आहे.
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात खेळताना मनीषने ४७ चेंडूत ८३ धावांची तडाखेबंद अर्धशतकी खेळी केली. यामध्ये त्याने ४ चौकार आणि ८ षटकार ठोकले. त्याच्या या खेळीमुळे हैदराबादने राजस्थानवर ८ विकेट्सने विजय मिळवला.
सर्वाधिक टी२० सामने खेळणारे भारतीय खेळाडू
३३७ सामने- रोहित शर्मा
३२७ सामने- एमएस धोनी
३१९ सामने- सुरेश रैना
२९८ सामने- दिनेश कार्तिक
२९१ सामने- विराट कोहली
२७४ सामने- युसूफ पठाण
२६९ सामने- शिखर धवन
२६५ सामने- हरभजन सिंग
२६४ सामने- रॉबिन उथप्पा
२५१ सामने- गौतम गंभीर
२५०* सामने- मनीष पांडे
महत्त्वाच्या बातम्या-
-विक्रमवीर पांडे! हैदराबादविरुद्ध अर्धशतक ठोकत मनीषने केला ‘खास’ विक्रम, वाचा सविस्तर
-हैदराबाद सनरायझर्सच्या ‘या’ निर्णयाने आयपीएलच्या १३ व्या हंगामातील परंपराच मोडली
-…आणि ‘असा’ निर्णय घेणारा सनरायझर्स हैदराबाद ठरला पहिलाच संघ
-मोहम्मद सिराजने केला कोलकाताच्या फलंदाजांचा चुराडा; नोंदवला मोठा विक्रम
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज
-आयपीएलमध्ये पहिले शतक झळकवण्यासाठी सर्वाधिक डाव खेळलेले ३ भारतीय फलंदाज
-आयपीएलमध्ये सलग चार सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज