इंडियन प्रीमियर लीग २०२२चा बारावा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हैदराबादचा संघ त्यांच्या हंगामातील पहिला विजय नोंदवण्यासाठी झगडताना दिसला. तर लखनऊचा संघ दुसऱ्या विजयासाठी प्रयत्नशील दिसला. या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना हैदराबादच्या संघाने शानदार प्रदर्शन केले. त्यांनी लखनऊ संघाला १६९ धावांवर रोखले. दरम्यान हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन याने संघाला पहिली विकेट मिळवून देण्यात मोलाचे सहकार्य केले.
तर झाले असे की, नाणेफेक जिंकून विलियम्सनने प्रथम गोलंदाजी निवडली होती. लखनऊकडून कर्णधार केएल राहुल व यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकला (Quinton De Kock) सलामीला फलंदाजीसाठी आले होते. मात्र संघाला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. हैदरबादचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याने त्याच्या पहिल्याच षटकात संघाला मोठी विकेट मिळवून दिली.
सुंदरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर डी कॉकने कव्हरच्या उजव्या दिशेला फटका मारला. परंतु आधीपासूनच विलियम्सन (Kane Williamson ice-cool Catch) कव्हरवर क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. त्याने आपल्याकडे येत असलेल्या चेंडूला टिपण्यात कसलीही चूक केली नाही. त्याने वेगाने मागच्या बाजूला हवेत झेपावत चेंडू पकडला आणि संघाला पहिली विकेट मिळवून दिली.
विलियम्सनच्या या झेलचा (Kane Williamson Catch) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या या झेलचे क्रिकेटप्रेमींकडून कौतुक केले जात आहे.
Sundar to de Kock, OUT 🎳
Quinton de Kock c Williamson b Washington Sundar 1 (4b 0x4 0x6) SR: 25 🎯#CricketMasterUpdater pic.twitter.com/QF4RF3mTqd— Live Cricket Master Updater (@MohsinM55415496) April 4, 2022
दरम्यान हैदराबादकडून या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर, रोमॅरिओ शेफर्ड आणि टी नटराजन यांनी शानदार गोलंदाजी केली. सुंदरने पावरप्लेमध्ये संघाला २ मोठ्या विकेट्स मिळवून दिल्या. तर शेफर्डने मनिष पांडेरूपी तिसरी विकेट घेत पावरप्लेचा शेवट केला. त्यानंतर त्यानेच संघाला अर्धशतकवीर दीपक हुडाची विकेट मिळवून दिली. पुढे १९ व्या षटकात नटराजनने संघाच्या खात्यात अजून २ विकेट्स जोडल्या. त्याने कृणाल पंड्या आणि केएल राहुलला एकाच षटकात पव्हेलियनला धाडले.
लखनऊ सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यासाठी सनरायझर्स हैदराबाद संघ– केन विलियम्सन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडेन मार्करम, अब्दुल सामद, रोमारियो शेफर्ड, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पंचांच्या निर्णयामुळे काव्या झाली होती उदास; पण पुढच्याच षटकात घडले असे काही की परतली स्माईल
धोनीच्या सीएसकेची दाणादाण उडवणारा पदार्पणवीर वैभव अरोरा, एकेकाळी क्रिकेटला ठोकणार होता रामराम
कोण आहे जीतेश शर्मा? ज्याने आयपीएल पदार्पणात स्टार क्रिकेटर धोनीला बाद करण्यात दिले योगदान