इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ४६वा सामना रविवारी (दि. ०१ मे) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला गेला. यामध्ये नाणेफेक जिंकत हैदराबादने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी चेन्नईकडून सलामीला ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे उतरले होते. यावेळी युवा फलंदाज ऋतुराजने शानदार फटकेबाजी केली. मात्र, त्याला आपले शतक साजरे करता आले नाही. तो ९९ धावांवर तंबूत परतला.
चेन्नईकडून (Chennai Super Kings) सलामीला उतरलेल्या ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) सुरुवातीपासूनच फटकेबाजी करण्यास सुरुवात केली होती. यावेळी त्याने ५७ चेंडूंचा सामना करताना ९९ धावा केल्या. या धावा करताना त्याने ६ चौकार आणि ६ षटकारांचा पाऊस पाडला. विशेष म्हणजे, ऋतुराज जेव्हा १७.५ षटकात टी नटराजनच्या गोलंदाजीवर बाद झाला, तेव्हा संघाची धावसंख्या १ विकेट्स गमावत १८२ इतकी होती. विशेष म्हणजे, ऋतुराज आणि कॉनवेच्या फटकेबाजीमुळे त्यांनी एक खास कारनामाही केला.
Oh no!
Ruturaj Gaikwad departs on 99. Nonetheless a great knock from him 👏👏
Live – https://t.co/8IteJVPMqJ #SRHvCSK #TATAIPL pic.twitter.com/Mf5Si5Y91I
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2022
आयपीएलमध्ये चेन्नईकडून सर्वोच्च भागीदारी
ऋतुराजने आणि कॉनवेने पहिल्या विकेटसाठी आयपीएलमध्ये चेन्नईसाठी सर्वोच्च भागीदारीही रचली. त्यांनी एकूण १८२ धावांची भागीदारी केली. यामध्ये ऋतुराजच्या ९९ आणि कॉनवेच्या ७४ धावांचे योगदान होते. विशेष म्हणजे, यापूर्वी चेन्नईसाठी शेन वॉटसन आणि फाफ डू प्लेसिसने २०२०मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध खेळताना १८१ धावांची भागीदारी केली होती. याव्यतिरिक्त चेन्नईसाठी रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबेने यंदाच्याच हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध खेळताना १६५ धावांची भागीदारी रचली होती.
हैदराबादविरुद्धची सर्वोच्च भागीदारी
याव्यतिरिक्त सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सर्वोच्च भागीदारीबद्दल बोलायचं झालं, तर ऋतुराज आणि कॉनवेची १८२ धावांची आतापर्यंतची सर्वोच्च भागीदारी होती. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांनी आयपीएल २०१६मध्ये केलेली भागीदारी आहे. त्यांनी १५७ धावा चोपल्या होत्या. त्यानंतर जोस बटलर आणि संजू सॅमसन यांनी २०२०साली केलेली १५० धावांची भागादारी तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ऋतुराजच्या यंदाच्या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने या सामन्यासह आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यात २६.३३च्या सरासरीने २३७ धावा केल्या आहेत. यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितची विकेट पडल्यावर ढसाढसा रडली पत्नी रितिका
ताशी १५०हून अधिकच्या गतीने चेंडू फेकणाऱ्या उमरान मलिकवर गांगुलीही फिदा; वाचा काय म्हणाला ‘दादा?’