---Advertisement---

स्टार्कच्या भेदक माऱ्यासमोर हैदराबाद ढेपाळले, दिल्ली समोर 164 धावांचे लक्ष्य!

On: रविवार, मार्च 30, 2025 5:35 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 चा दहावा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो दिल्लीच्या गोलंदाजांनी चुकीचा सिद्ध केला. पहिल्याच षटकात अभिषेक शर्मा धावबाद झाला आणि त्यानंतर मिचेल स्टार्कने ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी आणि ट्रॅव्हिस हेड यांना स्वस्तात बाद करून हैदराबादचा टॉप ऑर्डर उद्ध्वस्त केला.

दिल्ली कॅपिटल्सकडून मिचेल स्टार्कने पहिला षटक टाकला. षटकात सलग दोन चौकार मारल्यानंतर, ट्रॅव्हिस हेडला पाचव्या चेंडूवर एक धाव घ्यायची होती पण समन्वयाच्या अभावामुळे अभिषेक शर्मा धावबाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेला ईशान किशन पुन्हा एकदा फ्लॉप झाला. तो फक्त 2 धावा काढल्यानंतर मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर विकेटच्या मागे झेलबाद झाला. त्यानंतर हेनरिक क्लासेन (32 धावा) अनिकेत वर्मा (74 धावा) यांच्या खेळीच्या जोरीवर संघ 18.4 षटकात 163-10 धावसंख्येपर्यंत पोहोचला. दिल्लीकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या, आता दिल्लीला हंगामातील दुसरा विजय मिळवण्यासाठी 164 धावांची गरज आहे.

पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-

हैदराबाद- ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, हर्षल पटेल, मोहम्मद शमी

दिल्ली – जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---