आयपीएलमध्ये गुरुवारी (8 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने किंग्स इलेव्हन पंजाबला 69 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. हैदराबादचे सलामीवीर जॉनी बेयरस्टो आणि डेविड वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी 160 धावांची भागीदारी केली. बेयरस्टोने 97 धावांची मोठी खेळी केली. त्याच्या या खेळीमुळेच हैदराबादला 201 धावा करता आल्या. उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौवरवण्यात आहे. सामन्यानंतर डेविड वॉर्नर सोबत फलंदाजी करायला मजा येते असे बेयरस्टोने सांगितले
सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर बेअरस्टोने सांगितले की, “मी खूप आनंदी आहे. आयपीएल कारकिर्दीतील हे माझे पाचवे अर्धशतक आहे. टी20 मध्ये सतत फटकेबाजी करणे गरजेचे असते.”
वॉर्नर आणि बेयरस्टो या दोघांनी मिळून आयपीएलमध्ये हैदराबाद संघासाठी 1000 पेक्षा जास्त धावां केल्या आहेत. गुरुवारच्या सामन्यात वॉर्नरनेही अर्धशतक करताना 52 धावांची खेळी केली.
War-Stow game ???? point! ????????????#SRHvKXIP #OrangeArmy #KeepRising @jbairstow21 @davidwarner31 pic.twitter.com/GIeWXmCe8S
— SunRisers Hyderabad (@SunRisers) October 8, 2020
वॉर्नरबद्द्ल बोलताना बेयरस्टो म्हणाला, “त्याच्याबरोबर फलंदाजी करायला नेहमीच मजा येते. तो महान खेळाडू आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. हे त्याचे 46 वे अर्धशतक आहे. त्याची आयपीएलमधील आकडेवारी पाहून स्पष्ट होते की तो दिग्गज खेळाडू आहे. यूएईमधील खेळपट्ट्या भारतातील खेळपट्ट्यांपेक्षा वेगळ्या आहेत. येथील वातावरणही उष्ण आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतरही पंजाबच्या ‘या’ फलंदाजाचीच होतेयं सर्वत्र चर्चा
मॅक्सवेल होतोय ट्रोल, तर पूरन, राशिदवर होतोय कौतुकाचा वर्षाव; पाहा काही खास ट्विट्स
IPL 2020: आज दिल्ली-राजस्थान येणार आमने सामने, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही