आयपीएल 2025 मध्ये 27व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जविरुद्ध मोठी कामगिरी केली. टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकांत 6 गडी गमावून 245 धावा केल्या. प्रत्युत्तरात, सलामीवीर अभिषेक शर्माच्या ऐतिहासिक शतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने 18.3 षटकांत 2 गडी गमावून 246 धावांचे लक्ष्य गाठले.
हैदराबादच्या या विक्रमी विजयात अभिषेक शर्माने 55 चेंडूत 14 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 141 धावांची ऐतिहासिक खेळी केली. अभिषेक शर्माने त्याच्या शतकाचे श्रेय ऑरेंज आर्मीला दिले. याशिवाय ट्रॅव्हिस हेडने 37 चेंडूत 66 धावा केल्या. हेनरिक क्लासेन 21 आणि ईशान किशन 9 धावांवर नाबाद राहिले. पंजाबकडून चहल आणि अर्शदीप यांनी प्रत्येकी फक्त 1 बळी घेतला.
???? ????????????????-???????????????????????? ???????????? ????
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2025
A stunning maiden #TATAIPL century from Abhishek Sharma keeps #SRH on ???? in this chase ????
Updates ▶ https://t.co/RTe7RlXDRq#TATAIPL | #SRHvPBKS | @SunRisers pic.twitter.com/ANgdm1n86w
???????????????????? ????????????????: ????
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2025
???? Catch a glimpse of how Abhishek Sharma raced towards a record knock of an explosive 141 (55) ????????
Updates ▶ https://t.co/RTe7RlYbGY#TATAIPL | #SRHvPBKS | @SunRisers pic.twitter.com/8vjvkKYPMS
प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने कर्णधार श्रेयस अय्यरच्या 82 धावांच्या खेळीच्या जोरावर 20 षटकांत 6 गडी गमावून 245 धावा केल्या. प्रभसिमरनने 23 चेंडूत 42 धावांचे योगदान दिले. डेथ ओव्हर्समध्ये मार्कस स्टोइनिसने फक्त 11 चेंडूत 34 धावा केल्या.






