---Advertisement---

SRH vs PBKS: हैदराबादच्या यशामागचं रहस्य: ‘या’ क्षणाने बदललं सगळं चित्र!

On: रविवार, एप्रिल 13, 2025 6:36 AM
---Advertisement---

आयपीएल 2025 च्या 27 व्या सामन्यात, पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना आयपीएल 2025 मधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या केली. हे मोठे लक्ष्य पाहिल्यानंतर, एके क्षणी असे वाटले की सनरायझर्स हैदराबाद संघाला ते साध्य करणे खूप कठीण जाईल. कारण गेल्या चार सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तथापि, अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यातील 171 धावांच्या सलामी भागीदारीमुळे सनरायझर्स हैदराबादने 9 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.

आयपीएलच्या इतिहासात लक्ष्याचा पाठलाग करताना मिळालेला हा दुसरा सर्वोच्च विजय आहे. 246 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, अभिषेक शर्मा (141) च्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी आणि हेडसह 171 धावांच्या सलामी भागीदारीच्या जोरावर सनरायझर्सने 18.3 षटकांत 2 बाद 247 धावा केल्या. अभिषेकचे हे शतक आयपीएलमधील कोणत्याही भारतीय फलंदाजाने झळकावलेले सर्वोच्च शतक आहे. अभिषेकने 55 चेंडूत 14 चौकार आणि 10 षटकारांसह 141 धावा केल्या, तर ट्रॅव्हिस हेडने 37 चेंडूत तीन षटकार आणि नऊ चौकारांसह 66 धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक आणि हेडने सनरायझर्सना शानदार सुरुवात करून दिली. सामन्यात अभिषेक शर्माला दोनदा जीवदान मिळाले. 3.4 षटकांत यश ठाकूरच्या चेंडूवर अभिषेक झेल दिला, पण तो चेंडू नो-बाॅल होता. त्यानंतर 7.1 षटकांत अभिषेकला पुन्हा एकदा जीवदान मिळाले. फिरकीपटू युझवेंद्र चहलने त्याचे झेल सोडला. हा झेल पंजाबला खुपच महागात पडला.

शेवटी अभिषेक शर्माने 55 चेंडूत 141 धावा ठोकून सामना एकतर्फी जिंकवला. याशिवाय ट्रॅव्हिस हेडने देखील 37 चेंंडूत 66 धावा केल्या. हैदराबादचा हंगामातील हा दुसरा विजय ठरला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---