आयपीएल 2024 मधील 41 वा सामना काल (दि. 25 एप्रिल) हैद्राबादेतील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झाला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाचा दणदणीत पराभव केला. आरसीबीने सनरायझर्स हैदराबादवर 35 धावांनी मात करत विजय साकारला आणि सलग दोन पराभवांच्या हॅटट्रीक नंतर मोसमातील दुसरा विजय मिळवला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कडून या सामन्यात रजत पाटीदारची शानदार फलंदाजी पाहायला मिळाली. रजत पाटीदारने या सामन्यात एका षटकात सलग चार षटकार मारत एक खास पराक्रम केला आहे. त्याने असा विक्रम केला आहे, जो गेल्या 11 वर्षांत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या एकाही फलंदाजाने केला नव्हता. अगदी विराट कोहलीने देखील. ( srh vs rcb ipl 2024 rajat patidar become second player hit fastest fifty for rcb )
रजत पाटीदारने या सामन्यात 250 च्या स्ट्राईक रेटने 20 चेंडूत 50 धावा केल्या. या दरम्यान पाटीदारने 2 चौकार आणि 5 षटकार मारले. रजत पाटीदारने 50 धावांचा टप्पा गाठण्यासाठी 19 चेंडू घेतले. आरसीबीसाठी हे संयुक्त दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. त्याचवेळी आरसीबी संघासाठी 11 वर्षांनंतर प्रथमच एका फलंदाजाने अर्धशतक करण्यासाठी 20 पेक्षा कमी चेंडूंचा सामना केला आहे. याआधी 2013 मध्ये ख्रिस गेलने 17 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
आरसीबीसाठी आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारे फलंदाज :
17 चेंडू – ख्रिस गेल
19 चेंडू – रजत पाटीदार
19 चेंडू – रॉबिन उथप्पा
The Punch.ev Electric Striker of the Match between @SunRisers & @RCBTweets goes to Rajat Patidar#TATAIPL | @Tataev | #PunchevElectricStriker | #BeyondEveryday | #SRHvRCB pic.twitter.com/zvYsVOmovt
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2024