इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2024 मधील 41 वा सामना आज (दि. 25 एप्रिल) सनरायजर्स हैद्राबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होत आहे. हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात हैद्राबाद संघाचे पारडे जड मानले जात आहे. तर, बंगळुरु संघ हंगामातील आपल्या दुसऱ्या विजयाच्या शोधात आहे. महत्वाच्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ( SRH Vs RCB Live Royal Challengers Bangalore opt to bat against Sunrisers Hyderabad )
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
सनरायझर्स हैद्राबाद – अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (डब्ल्यू), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (क), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, टी नटराजन
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (क), विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (डब्ल्यू), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, यश दयाल
हैद्राबाद सबस्टिट्युट : उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, ट्रॅव्हिस हेड
आरसीबी सबस्टिट्युट : सुयश प्रभुदेसाई, अनुज रावत, हिमांशू शर्मा, विजयकुमार विशक, स्वप्नील सिंग