राजस्थान रॉयल्सचा (RR) पराभव करुन सनरायझर्स हैदराबादनं (SRH) आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये प्रवेश केला. (24 मे) रोजी चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या क्वालिफायर 2 सामन्यात राजस्थानचा 36 धावांनी पराभव झाला. पराभवानंतर कर्णधार संजू सॅमसन म्हणाला, “आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. परंतु आमचे फलंदाज मधल्या षटकात चांगली कामगिरी करु शकले नाहीत.” राजस्थानचे फलंदाज महत्वाच्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करु शकले नाहीत. संजू सॅमसनपासून कोणताही खेळाडू मोठी खेळी खेळू शकला नाही.
सनरायझर्स हैदराबादनं 176 धावांच आव्हान राजस्थानसमोर ठेवलं होत. राजस्थानकडून लक्ष्याचा पाठलाग करताना ध्रुव जुरेलनं 35 चेंडूत 56 धावांचे योगदान दिलं. त्यामध्ये त्यानं 7 चौकांरासह 2 उत्तुंग षटकारदेखील लगावले. सलामीवीर फलंदाज यशस्वी जायस्वालनं 21 चेंडूत 42 धावांची तुफानी खेळी खेळली. यांच्या जोरावर राजस्थान 7 विकेट गमावून केवळ 139 धावांवरती पोहचलं. हैदराबादकडून शाहबाज अहमदनं 23 धावा देऊन 3 बळी घेतले. तर अभिषेक शर्मानं 24 धावा देऊन 2 बळी घेतले.
याआधी हैदराबादकडून हेनरिक क्लासेननं 34 चेंडूत 4 षटकारांच्या मदतीनं 50 धावा ठोकल्या. त्यावर हैदराबादनं 9 विकेट गमाावून 175 धावा कुटल्या. संजू सॅमसन म्हणाला, “आमच्या गोलंदाजांवर आम्हाला गर्व आहे. परंतु मधल्या षटकात ज्या प्रकारे कामगिरी करण्याची गरज होती. तशी करु शकलो नाही . सामन्यादरम्यानं दव पडलं नव्हतं. त्यामुळे हैदराबादच्या गोलंदाजांना गोलंदाजी करणं सोपं झालं. दव कधी पडणार आणि कधी नाही. याचा अंदाज लावणं खूप कठीण होतं.”
सॅमसन पुढे म्हणाला, “दुसऱ्या डावात खेळपट्टी खूप बदलल्याप्रमाणे वाटत होती. चेंडू फिरत होता. हैदराबादच्या फिरकीपटूंनी आमच्या फलंदाजांना उत्कृष्ट गोलंदाजी केली.” सॅमसननं संपूर्ण हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या ध्रुव जुरेल आणि रियान परागचं कौतुक केलं.
महत्वाच्या बातम्या-
भारत-पाकिस्तान सामना होणार ‘या’ मैदानावर, मैदानाचे सौंदर्य पाहून चाहते थक्क!
पॅट कमिन्सच्या संघाची आणखी एका फायनलमध्ये धडक, हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय
टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची घोषणा, मोहम्मद अमीरचं पुनरागमन