इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा ३१ वा सामना आज (०४ मे) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. कोरोना महामारीमुळे यापुर्वीचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आणि आगामी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स हे सामने पुढे ढकलण्यात आले आहेत. परंतु बीसीसीआयने मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्याला हिरवा कंदील दाखवल्याने दिल्ली येथे संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.
तत्पुर्वी हैदराबाद संघातून मोठी बातमी पुढे येत आहे. त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला असल्याचे समजत आहे. त्यामुळे पुन्हा मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
BREAKING: Sunrisers Hyderabad's Wriddhiman Saha has tested positive for Covid-19 #IPL2021
More to follow… pic.twitter.com/hAqNc6o2JQ
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 4, 2021
तसे तर, आयपीएल २०२१ मध्ये एखाद्या खेळाडूला कोरोनाची लागण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. नुकतेच कोलकाता संघाचे वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची बाधा झाली होती. तसेच चेन्नई सुपर किंग्ज संघातील ३ सदस्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. चेन्नईचे सीईओ कासी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बस चालक यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यांना ७ दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
वृद्धिमान साहाला या हंगामात अधिक सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने आतापर्यंत हैदराबादकडून अवघे २ सामने खेळले आहेत. त्यातही तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. या दोन सामन्यात त्याने अवघ्या ७ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल ब्रेकिंग! मुंबईविरुद्धच्या सामन्यापुर्वी हैदराबादचा ‘हा’ क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह
राजस्थान आणि कोलकाता संघाची चिंता शिगेला, ‘हे’ खेळाडू उर्वरित हंगामातून माघार घेण्याच्या तयारीत!
बिग ब्रेकिंग! एकाच आठवड्यात आयपीएलप्रेमींना दुसरा धक्का, चेन्नई-राजस्थान सामना पुढे ढकलला





