---Advertisement---

श्रीलंकेच्या झंझावाती फलंदाजाने सोडले क्रिकेट, चक्क फिटनेस टेस्टला कंटाळून घेतला निवृत्तीचा निर्णय!

Sri-Lanka
---Advertisement---

सध्या निवृत्तीचा बातम्या फारच ऐकायला मिळत आहेत. तशीच एक नवीन बातमी पुढे येत आहे. श्रीलंकेचे विस्फोटक फलंदाज भानुका राजपक्षे (Bhanuka Rajpaksa) यांनी तत्काळ निवृत्ती जाहीर (Bhanuka Rajpaksa Retired) केली आहे. त्याने श्रीलंका क्रिकेटकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. भानुका राजपक्षे यांनी कौटुंबिक कारणांमुळे लवकर निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. निवृत्तीसाठी त्याने श्रीलंका क्रिकेट संघाच्या कडक फिटनेस नियमां (Fitness Test)चाही हवाला दिल्याचे बोलले जात आहे.

यामध्ये स्किनफोल्ड टेस्टचा (शरीरातील चरबी मोजण्यासाठी चाचणी) विशेष उल्लेख करण्यात आला आहे. राजपक्षे यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर लसिथ मलिंगाने ट्विट करून या खेळाडूला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे.

श्रीलंकन ​​मीडियानुसार, निवृत्ती जाहीर करतेवेळी भानुका राजपक्षे म्हणाला की, “आता ज्या प्रकारचे फिटनेस नियम बनवले गेले आहेत, त्याचा त्याच्या पॉवर हिटिंगवर वाईट परिणाम होतो.” राजपक्षे याआधीही फिटनेसच्या मुद्द्यावरून वादात सापडले आहेत. श्रीलंकेचे माजी प्रशिक्षक मिकी आर्थर यांनीही या मुद्द्यावर त्यांची ताशेरे ओढले होते. त्यांनी सांगितले होते की, राजपक्षे त्यांना सांगितलेला आहार पाळत नाहीत. त्याऐवजी ते चॉकलेट खात आहेत. त्यानंतर राजपक्षे यांनी संघ व्यवस्थापनावर खेळाडूंसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला.

हेही वाचा- मेगा ऑक्शनमध्ये ‘या’ ५ खेळाडूंना सीएसके करेल टार्गेट! एकावर तर असेल कर्णधार धोनीचे बारीक लक्ष

त्याचवेळी, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात त्यांनी कौटुंबिक जबाबदारीमुळे निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. त्यात राजपक्षे यांनी म्हटले आहे की, ‘खेळाडू, वडील या नात्याने मी माझ्या पदाचा काळजीपूर्वक विचार केला आहे आणि वडील म्हणून माझी भूमिका आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या लक्षात घेऊन हा निर्णय घेत आहे.’ मात्र श्रीलंका बोर्डाने अद्याच राजपक्षे यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही.

लसिथ मलिंगाने राजपक्षे यांना निवृत्तीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगताना काय लिहिले?
‘आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे सोपे काम नाही आणि खेळाडूंना नेहमीच आव्हानांचा सामना करावा लागतो. मला विश्वास आहे की भानुका राजपक्षे श्रीलंका क्रिकेटसाठी खूप काही करू शकतात आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा.’

राजपक्षे यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
भानुका राजपक्षे यांनी श्रीलंकेसाठी पाच एकदिवसीय आणि 18 टी-20 सामने खेळले आहेत. दोन्ही स्वरुपात मिळून त्यांनी दोन अर्धशतकांच्या जोरावर 409 धावा केल्या आहेच. 2021 च्या टी विश्वचषकासाठी ते श्रीलंकेच्या संघाचाही भाग होते. या स्पर्धेत त्यांनी श्रीलंकेसाठी आठ सामन्यांत 155 धावा केल्या होत्या. अलीकडच्या काळात अनेक श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंनी निवृत्ती घेतली आहे. अमेरिकेतील चांगल्या संधींमुळे अनेकजण श्रीलंकन ​​क्रिकेटपासून दुरावले आहेत. भानुका राजपक्षेही अमेरिकेचा रस्ता धरू शकतात, अशी शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अति शहानपणा नडला! ‘तोंड बंद ठेव’, म्हणत द. आफ्रिकी गोलंदाजाला भिडला अन् असा तोंडघशी पडला

मेगा ऑक्शनमध्ये ‘या’ ५ खेळाडूंना सीएसके करेल टार्गेट! एकावर तर असेल कर्णधार धोनीचे बारीक लक्ष

स्टंपमाइकमध्ये कैद झाली मयंक अगरवालची स्लेजिंग; डीन एल्गारला म्हणाला, ‘स्वार्थी कर्णधार’- Video

हेही पाहा- 

डकवर्थ लुईस नियमाला पर्याय ठरणारी भारतीय पद्धत । What Is VJD Method Of Cricket?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---